महाराष्ट्रातील दाभोळ प्रकल्पाशी संबंधित देणी थकविल्याबद्दल बँकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वायू पुरवठय़ाच्या तुटवडय़ामुळे हा प्रकल्प २०१३च्या ऑक्टोबर महिन्यापासून बंद आहे.
दाभोळ ऊर्जा प्रकल्प हा ‘रत्नागिरी गॅस अ‍ॅण्ड पॉवर प्रा.लिमिटेड’ या नावेही ओळखला जातो. या प्रकल्पास पुरेसा वायू पुरवठा होत नसल्यामुळे तो कमालीचा अडचणीत आला आहे आणि कंपनीकडून वेळेत देणी चुकविण्यात न आल्यामुळे बँकाही अडचणीत आल्या आहेत. विविध बँकांचे ८,५०० कोटी रुपये या प्रकल्पात अडकले आहेत. या बँकांमध्ये आयडीबीआय, स्टेट बँक, आयसीआयसीआय व कॅनरा बँकेचा समावेश आहे.