पाकिस्तान बॉम्बस्फोट होऊन त्यात ६९ जणांचा मृत्यू झाल्याची तर ३५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानात नवाबजादा सिराज रायसानी यांनी निवडणुकीसंदर्भात एक रॅली होती. या रॅलीदरम्यानच हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. बलुचिस्तान अवामी पार्टी चे उमेदवार नवाबजादा सिराज रायसानी यांचाही मृत्यू झाला आहे. जिओ टीव्हीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

क्वेट्टा या ठिकाणी हा स्फोट झाला, सिराज रायसानी यांची निवडणूक रॅली होती. त्यावेळी अचानक स्फोट झाला आणि या स्फोटात सिराज रायसानी यांचा मृत्यू झाला. त्यांचा भाऊ मीर याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीर रायसानी हे या स्फोटात जखमी झाले आहेत. एका मोटारसायकलमध्ये हा सुसाईड बॉम्ब होता असे वृत्त समोर येते आहे.