अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत किती सजग आहेत हे अनेकदा पाहण्यात आलंय. ते केवळ चांगले पती नाही तर चांगले पिता देखील आहेत हे पटवून देणारं वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिलं आहे. बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी आपली मोठी मुलगी मालिया हिचा नवा बॉयफ्रेंड रॉरी फॉर्कुर्सन याला पत्र पाठवल्याचं वृत्त येथील माध्यमांनी दिलं आहे.

स्वतः प्रसीद्ध असल्याबद्दल बराक ओबामा आणि मिशेल ओबामा यांनी रॉरी फॉर्कुर्सन याला पत्र पाठवून माफी मागितली आहे. आपल्या मुलीसोबत नाव जोडल्यामुळे रॉरी फॉर्कुर्सनला मीडियाचं टेन्शन असेल, त्याच्या कुटुंबियांना नाहक त्रास होत असेल म्हणून बराक ओबामा यांनी माफी मागितली असल्याचं वृत्त येथील माध्यमांनी दिलं आहे. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, बराक ओबामांची मुलगी मालिया (19) आणि रॉरी(20) यांची गेल्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेत असताना ओळख झाली.

आपल्या मुली आणि कुटुंबियांच्याबाबतीत बराक ओबामा यापूर्वीही चर्चेत राहिले आहेत. 2016 मध्ये एका हॉटेलमध्ये काम केल्याने त्यांची छोटी मुलगी साशा बरीच चर्चेत होती.