अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे ट्विटरविश्वात आल्यानंतर अवघ्या १२ तासांत त्यांना १.४६ दशलक्ष फॉलोअर्स मिळाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अ‍ॅट पोट्स खाते तयार केले असून त्यामुळे त्यांना थेट संपर्क साधता येणार आहे. ओबामा यांनी ६५ जणांना फॉलो करण्यात सुरुवात केली आहे व त्यात एकही परदेशी नेता नाही.
बराक ओबामा म्हणतात, ‘हॅ्लो ट्विटर इटस बराक रिअली, सिक्स इयर्स इन, दे आर फायनली गिव्हिंग मी माय ओन अकाउंट’ त्यानंतर चार तासांनी ओबामांनी दुसरे ट्विट केले आहे ते न्यूजर्सीतील भेटीविषयी आहे.
ते म्हणतात, कॅमडेन येथे आज चांगल्या धोरणांनी समाज कसा सुरक्षित होतो हे पाहिले. त्यांनी तिसरा ट्विट माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या ट्विटवर प्रतिक्रियेवर दिला आहे. वेलकम टू अ‍ॅट ट्विटर अ‍ॅट पोट्स तुम्हाला एक प्रश्न- तुमचे यूजरनेम कार्यालयाकडे राहणार का.. असे क्लिंटन विचारतात. त्यावर ओबामांचे उत्तर.. चांगला प्रश्न आहे. ट्विटर हँडल व्हाइट हाऊसकडे राहील, अ‍ॅट पोट्समध्ये कुणाला स्वारस्य आहे का..
ओबामा यांनी व्हाईट हाऊस अधिकारी, मंभी, शिकागो स्पोर्ट्स टीम्स यांना फॉलो केले आहे. ट्विटर खात्याच्या माध्यमातून ते अमेरिकी जनतेशी संपर्क साधणार आहेत. ओबामा प्रशासन हे खुले व सहभागात्मक प्रक्रियांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातच आता अ‍ॅट पोट्स हा नवीन मंच अमेरिकी लोकांना त्यांची मते मांडण्यासाठी खुला झाला आहे