News Flash

अविस्मरणीय दौऱयाबद्दल ओबामांकडून मोदींचे आभार

भारतीयांच्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपला दौरा अविस्मरणीय झाल्याचे सांगत मंगळवारी दुपारी सौदी अरेबियाकडे प्रयाण केले.

| January 27, 2015 03:32 am

भारतीयांच्या आदरातिथ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपला दौरा अविस्मरणीय झाल्याचे सांगत मंगळवारी दुपारी सौदी अरेबियाकडे प्रयाण केले. जवळपास अडीच दिवसांचा ओबामा यांच्या दौऱयाचा मंगळवारी दुपारी समारोप झाला. पत्नी मिशेलसह ओबामा यांनी नवी दिल्लीतील पालम हवाई तळावरून सौदी अरेबियाकडे प्रयाण केले. व्हाईट हाऊसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
भारतातून परतण्यापूर्वी ओबामा यांनी दक्षिण दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृहात निवडक मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी मनमोकळा संवाद साधला. या संवादातून भारत आणि अमेरिका मैत्रीसंबंध, मानवाधिकार, स्वातंत्र्य, महिलांची प्रगती यासह विविध विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2015 3:32 am

Web Title: barack obama says thank you to narendra modi
टॅग : Barack Obama
Next Stories
1 ‘बीएसएफ’ जवानांच्या बाईकवरील कसरतींनी ओबामा भारावले
2 व्याघ्र संवर्धन प्रकल्प वाढविणार
3 मिशेल यांचे ड्रेस डिझायनर अनिवासी भारतीय मोहपात्रा
Just Now!
X