अमेरिकेतील सर्वात हिंसक हल्ल्यात ओरलँडो येथे ५० जण मरण पावल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा गुरुवारी तेथे जाऊन मृतांना श्रद्धांजली वाहणार आहेत, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.

व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जॉश अर्नेस्ट यांनी सांगितले, की गुरुवारी अध्यक्ष ओबामा फ्लोरिडातील ओरलँडो येथे जाऊन हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहतील. आयसिसविरोधात मोहिमांचा आढावा घेण्यासाठी ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पथकास बोलावून घेतले आहे. ही बैठक उद्या होत असून, बंदूक नियंत्रण कायद्यावर अमेरिकी काँग्रेसच्या निष्क्रियतेबाबत ओबामा यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. लोकांना या कायद्यातील उणिवांमुळे बंदुका सहज मिळतात, असे ओबामा यांनी म्हटल्याचे अर्नेस्ट यांनी स्पष्ट केले. हिंसाचार थांबवू शकेल असा कुठलाही एक कायदा नाह, पण काँग्रेसने शहाणपण वापरून व्यक्तिगत पातळीवर लोकांना बंदुका मिळणार नाहीत, यासाठी उपाययोजना करायला हव्यात असे ओबामा यांचे मत आहे. दहशतवादाच्या मुकाबल्याचा प्रश्न येतो तेव्हा आयसिस व इतर दहशतवादी संघटना अमेरिकेला लक्ष्य करीत आहेत, त्याबाबत अमेरिकी अध्यक्षांचा अग्रक्रम हा अमेरिकी लोकांचे संरक्षण करण्याला आहे असे अर्नेस्ट यांनी स्पष्ट केले. ओबामा यांनी ओरलँडोच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना मूलतत्त्ववादी इस्लामी व्यक्तीचे कृत्य असा शब्दप्रयोग केला नाही, याबाबत अमेरिकी अध्यक्षीय शर्यतीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर ओबामा यांनी काहीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे असे ते म्हणाले.

Baramati Namo MahaRojgar Melava
बारामतीमधील शासकीय कार्यक्रमासाठी शरद पवारांना पहिल्यांदा डावललं; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
Sharad Pawar was given a clear speech by the Collector Office on the invitation of Namo Maha Rozgar Melava
… म्हणून शरद पवार यांना नमो महा रोजगार मेळाव्याचे निमंत्रण नाही; जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली ‘ही’ स्पष्टोक्ती
Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…
no announcement on old pension scheme in maharashtra interim budget 2024
Maharashtra Budget session 2024: जुन्या निवृत्तिवेतन योजनेची प्रतीक्षाच

‘लोन वुल्फ’ हल्ल्यांपासून सावध राहण्याचा नागरिकांना इशारा

एकेकटय़ा हल्लेखोराकडून केले जाणारे ‘लोन वुल्फ’ हल्ले आता चिंतेचा विषय बनले आहेत त्यामुळे अमेरिकी लोकांनी त्यापासून सावधानता बाळगली पाहिजे असे ओबामा प्रशासनाने म्हटले आहे. ओरलँडो येथे समलिंगींच्या नाइटक्लबमध्ये अफगाणी वंशाच्या स्व मूलतत्त्ववादी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात पन्नासजण ठार झाले होते. त्या पाश्र्वभूमीवर व्हाइट हाऊसचे प्रसिद्धी सचिव जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, अध्यक्ष ओबामा व त्यांच्या सुरक्षा चमूला लोकांवर होत असलेल्या लोन वुल्फ हल्ल्यांबाबत काळजी वाटते आहे. दहशतवादविरोधी प्रयत्नांना लोन वुल्फ हल्ल्यांचे आव्हान आहे व अंतर्गत सुरक्षा खाते असे हल्ले मोडून काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. लोन वुल्फ हल्ल्यात संबंधित व्यक्ती एकटी असली तरी ती इतर साथीदारांशी संपर्कात असते व त्यामुळे त्यांचे हल्ल्याचे नियोजन समजणे कठीण असते असे त्यांनी एका प्रश्नावर सांगितले. लोन वुल्फ तंत्राने केल्या जाणाऱ्या हल्ल्यांबाबत एफबीआय चौकशी करीत असून लोकांनी सतर्क असले पाहिजे ते मोठे आव्हान आहे. अध्यक्षांच्या चमूतील कुणीच या धोक्याला कमी लेखलेले नाही. आयसिसला रणभूमीत पराभूत करण्याचे प्रयत्न आहेत पण त्यासाठी जास्त प्रयत्न लागतील, लोन वुल्फ हल्ल्यांना रोखण्यासाठी सध्या प्राधान्यक्रम द्यावा लागणार आहे, असे ते म्हणाले. ओरलँडो येथे ओमर मटिन या अफगाणी वंशाच्या व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात ४९ ठार व ५३ जण जखमी झाले होते.