उत्तर प्रदेशातील अलाहाबादमध्ये भाजपा आमदाराच्या मुलीचं अपहरण झाल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. मात्र काही वेळातच मुलगी न्यायालयात हजर झाल्याने ही फक्त अफवा असल्याचं स्पष्ट झालं. साक्षी मिश्रा ही बरेलीमधील भाजपा आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी काही दिवसांपुर्वी तिने एक व्हिडीओ शेअर करत वडिलांपासून आपल्या आणि पतीच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत असून सर्वांचंच याकडे लक्ष लागलं आहे. यामुळेच जेव्हा साक्षी मिश्रा आणि तिच्या पतीचं अपहरण झाल्याचं वृत्त आलं तेव्हा सगळीकडे खळबळ उडाली होती.
साक्षी मिश्राने गेल्या गुरुवारी अजितेश कुमार याच्याशी लग्न केलं आहे. पण अजितेश दलित असल्याने लग्नाला विरोध होत असल्याचा साक्षी मिश्राचा आरोप आहे. लग्न केल्यापासूनच साक्षी मिश्रा आपल्या पतीसोबत अज्ञात ठिकाणी लपून राहत आहे. काही दिवसांपुर्वी दोघांनी व्हिडीओ शेअर करत जीवाला धोका असून पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती.
Allahabad High Court gives directions to police for protection of Sakshi & Ajitesh; their lawyer says, “Only Ajitesh was beaten up. It’s not known who were these people. But it proves that there is indeed a threat to their life for which they were seeking protection” pic.twitter.com/1ucA2GeIrr
— ANI UP (@ANINewsUP) July 15, 2019
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अलाहाबाद न्यायालयाबाहेर अजितेश याला काहीजणांनी मारहाण केली. दोघेही सुरक्षेची मागणी करण्यासाठी न्यायालयात गेले होते. साक्षी आणि अजितेश यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त अजितेश याला मारहाण करण्यात आली. ते लोक कोण होते याची माहिती मिळू शकलेली नाही. पण यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सिद्ध झालं असून यासाठीच ते पोलीस सुरक्षा मागत होते.
‘पप्पा तुम्ही गुंड पाठवलेत’, जातीबाहेर लग्न केल्याने भाजपा आमदाराकडूनच मुलीच्या जीवाला धोका
याआधी न्यायालयात उपस्थित काही साक्षीदारांना शस्त्राचा धाक दाखवत एका दांपत्याचं अपहरण झाल्याची माहिती दिली होती. दांपत्य न्यायालयाबाहेर तीन क्रमांक गेटवर वाट पाहत उभं होतं. यावेळी एक काळी एसयुव्ही आली आणि दोघांनी बंदुकीचा धाक दाखवत अपहरण करुन घेऊन गेले.
अजितेश कुमारचे वडील हरिश कुमार यांनीही साक्षी आणि मुलगा कोठे आहे याची कल्पना नसल्याचं सांगितलं होतं. जीवाच्या भीतीने आपणही बरेली सोडलं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पोलिसांनीही आपल्याला त्यांचा ठावठिकाणा माहित नसल्याचं सांगितलं होतं. दरम्यान भाजपा आमदार राजेश मिश्रा यांनी मुलगी आता प्रौढ असून आपला निर्णय घेण्यात समर्थ असल्याचं सांगितलं होतं. यावेळी त्यांनी कोणतीही धमकी दिली नसल्याचंही म्हटलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 15, 2019 11:49 am