21 September 2020

News Flash

सोशल मीडियावर लष्कराविरुद्ध वक्तव्य, तीन काश्मिरी मुलींविरुद्ध कारवाई

देशभरात एकच संतापाची लाट उसळली आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतावादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले, त्यानंतर देशभरात एकच संतापाची लाट उसळली आहे. पण तीन काश्मिरी मुलींनी सोशल मीडियावर भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय लष्कराविरुद्ध समाजमाध्यमांवर कथितरीत्या विपरीत शेरेबाजी केल्याबद्दल बरेलीमधील भारतीय पशुवैद्यक संशोधन संस्थेने (आयव्हीआरआय) तीन काश्मिरी मुलींविरुद्ध कारवाई केली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला भीषण दहशतवादी हल्ला झाल्यानंतर या मुलींनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर काही विपरीत आणि आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. ग्रुपमधील इतर विद्यार्थ्यांनी याला आक्षेप घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर संस्थेने चौकशी करून मुलींवर कारवाई केली. दोन मुलींची पाठय़वृत्ती थांबवण्यात आली आहे, तर एका मुलीचा प्रवेश रद्द करण्यात आला आहे, असे आयव्हीआरआयचे कुलसचिव राकेश कुमार यांनी सांगितले. पाठय़वृत्ती थांबवण्यात आलेल्या दोन विद्यार्थिनींना यापुढे अशा कारवाया न करण्याची तंबी देण्यात आली असून, असे न केल्यास त्यांना बडतर्फ करण्यात येणार आहे.

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मदच्या एका आत्मघातकी हल्लेखोराने १०० किलोची स्फोटके असलेले वाहन सीआरपीएफच्या वाहनाला जाऊन धडकवले होते. यामुळे झालेल्या स्फोटात जवान शहीद झाले होते. सीआरपीएफचे २५०० हजार हून अधिक जवान ७८ वाहनांमधून प्रवास करत होते. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास श्रीनगर-जम्मू महामार्गावर दक्षिण काश्मीरच्या अवंतीपुरात परिसरात हल्ला करण्यात आला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 5:24 am

Web Title: bareillys ivri cancels admission of kashmiri student
Next Stories
1 शहीदांच्या पत्नीचे अश्रू पाहून पाणावले डोळे, महिला मुख्याध्यापिकानं सोनं विकून केली मदत
2 पाकिस्तानचे पाणी रोखणार
3 ‘राफेल’ आदेशाच्या फेरविचाराची सर्वोच्च न्यायालयाची तयारी
Just Now!
X