28 November 2020

News Flash

Baton Rouge shooting : अमेरिकन पोलिसांवर गोळीबार

बंदुकधा-याने पोलिसांवर केलेल्या गोळीबारात ७ पोलीस अधिकारी जखमी

अमेरिकेतल्या लुईझियाना राज्याची राजधानी बॅटन रुज येथे एका बंदुकधा-याने पोलिसांवर गोळीबार केला.  या गोळीबारात ७ पोलीस जखमी झालेत तर तीन पोलीस अधिका-यांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली.

बंदुकधारी इसम एअरलाईन महामार्गाच्या दिशेने जात असल्याचा निनावी फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र पोलिसांना पाहताच त्याने पोलिसांवर गोळ्या झाडल्या.

या चकमकीत आतापर्यंत ७ पोलीस अधिकारी जखमी झालेत. या अधिका-यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. तसेच हा बंदुकधारी मारला गेल्याचे समजते आहे परंतु याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. येथील स्थानिक वृत्तवाहिनींच्या माहितीनुसार परिसरात गोळीबार अजूनही सुरुच आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण असून या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2016 10:12 pm

Web Title: baton rouge shooting three us police officers dead several injured
Next Stories
1 काश्मिरमधील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी पाठवले २००० जवान
2 देशहित सर्वात आधी, जीएसटीच्या मुद्दयावर मोदींनी दिला सर्वपक्षांना सल्ला
3 पेमा खांडू अरूणाचलचे नवे युवा मुख्यमंत्री
Just Now!
X