ह्य़ूस्टन : अमेरिकेतील टेक्सासच्या बेलर कॉलेजऑफ मेडिसीन (बीसीएम) या संस्थेने करोनावरील लशीसाठी भारतातील बायोलॉजिकल ई लिमिटेड म्हणजे बीई कंपनीशी करार केला आहे.

बीसीएम कंपनीच्या मते  बीई कंपनीशी कोविड १९ प्रायोगिक लस निर्मितीचा करार करण्यात आला आहे. बीई कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे.  आविष्करण तंत्रज्ञानावर आधारित ही लस असून त्याचे व्यावसायिक उत्पादन बीई कंपनी करू शकेल, असा विश्वास टेक्सासच्या बीसीएमने व्यक्त केला आहे.

Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
jharkhand marathi news, logistic company fraud
झारखंडमधील कंपनीची पावणेसहा कोटींची फसवणूक, लॉजिस्टीक कंपनीच्या तिघांविरोधात गुन्हा
GE Aerospace going to Invest Rs 240 Crore in Pune Plant Expansion
विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

नॅशनल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसीन या संस्थेचे प्रा. पीटर होटेझ यांनी सांगितले की, दक्षिण आशियाच्या जास्त लोकसंख्या घनता असलेल्या शहरी भागात करोनाचा धोका आहे. या बाबत ह्य़ूस्टन येथील महावाणिज्यदूत असीम महाजन यांनी वेबिनारचे आयोजन केले होते. होटेझ व त्यांच्या चमूने करोनावर लस तयार केली असून गरीब देशांना लस मिळणार नाही, या काळजीतून त्यांनी भारतीय कंपनीशी करार केला आहे. सध्या त्या लशीवर भारतात चाचण्या चालू असून पुढील वर्षी ती बाजारात येईल. बीई (बायो-ई) होल्डिंग कंपनीचे संचालक नरेंद्र देव मंटेना  यांनी सांगितले की, जर लस यशस्वी झाली तर आम्ही वर्षांला कोटय़वधी डोस उपलब्ध करू.