दिल्लीतील केरळ भवनाच्या उपहारगृहात गोमांस शिजवले जात असल्याची तक्रार करणारा हिंदू सेनेचा अध्यक्ष विष्णू गुप्ता याला बुधवारी ताब्यात घेण्यात आले आहे. अशाप्रकारची खोटी तक्रार करणाऱया व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्याचे अधिकार पोलिसांना असून कायदेशीर बाजू पडताळून त्यानंतरच गुप्ता यांना अटक करायची की नाही याचा निर्णय घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

दिल्लीतील केरळ हाऊसवर पोलिसांचे छापे

दिल्लीतील केरळ हाऊसमध्ये गोमांस दिले जात असल्याच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी छापा टाकल्याने नवा राजकीय वाद उफाळून आला आहे. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर उपहारगृहाच्या मेन्यूकार्डमधून ‘बीफ करी’ हटवली असली तरी अद्याप वाद काही संपुष्टात आलेला नाही. केरळचे मुख्यमंत्री ओम्मन चंडी छापा टाकण्याचा हा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगत थेट पंतप्रधानांना पत्र लिहीले आहे. केजरीवाल यांनीही चंडी यांच्या आरोपांना पाठिंबा देत दिल्ली पोलिसांचा मनमानी कारभार चालत असल्याचे शरसंधान केले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी विष्णू गुप्ता या तक्रारदाराला ताब्यात घेऊन आज त्याची सविस्तर चौकशी केली. तर, गुप्ता याने आपण कोणतीही चुकीची तक्रार केली नसल्याचा दावा केला आहे.