केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या ट्विटरवर नेहमीच सक्रीय असतात. व्हिसा अथवा अन्य अडचणी ट्विटरद्वारे लोक सुषमा स्वराज यांना सांगतात आणि लोकांच्या अडचणी तातडीने सोडवण्याचा त्या पुरेपुर प्रयत्न करत असतात. ट्विटरवर स्वराज यांचे जेवढे चाहते त्याचप्रमाणे त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचीही काही कमी नाहीये. सोमवारीही एका व्यक्तीने स्वराज यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला, पण स्वराज यांनी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं आणि त्या व्यक्तीची अक्षरशः बोलती बंद केली.

‘व्हिसामाता’ नावाच्या एका ट्विटर हॅंडलवरुन, ”मॅडम तुम्ही व्हिसामातावरुन सिटिझनशिप माता केव्हा बनणार ? म्हणजे मला म्हणायचंय की, पाकिस्तानातून आलेले हिंदू आणि शिख शरणार्थींना नागरिकत्व द्यायला केव्हा सुरू करणार”, असं ट्विट करण्यात आलं. त्या व्यक्तीला सुषमा स्वराज यांनी त्याच्याच भाषेत उत्तर देताना, ”प्रिय पुत्र, नागरिकत्वाचे निर्णय हे गृह मंत्रालय घेत असतं, परराष्ट्र मंत्रालयाचं ते काम नाही”, असं ट्विट केलं. यासोबतंच स्वराज यांनी त्या व्यक्तीला आशीर्वाद देताना ट्विटच्या अखेरीस ‘आयुष्मान भव’ असं म्हटलं. स्वराज यांच्याकडून आलेल्या या भन्नाट उत्तरानंतर ट्रोल करणाऱ्या त्या व्यक्तीने ते ट्विट डिलिट केलं.

येथे पाहा डिलिट केलेलं ट्विट –