पाकिस्तानला भारताकडून पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची भीती सतावतेय. 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइकचा आदेश देऊ शकतात असं वक्तव्य पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशिद यांनी केलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळख असलेले शेख रशिद यांनी लाहोरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना, 2019 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी मोदी पुन्हा सर्जिकल स्ट्राइकचा आदेश देऊ शकतात असं म्हटलं. पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये मोदींचा पराभव झालाय. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांत कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांना खुष करण्यासाठी आणि त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी मोदी पुन्हा सर्जिकल स्ट्राइकचा आदेश देऊ शकतात असं ते म्हणाले.

तर, पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यांचं हे विधान म्हणजे त्यांच्याकडे अद्यापही दहशतवादी कारवाया सुरू असल्याचं दर्शवतं. त्यामुळे आमच्या सीमा सुरक्षीत ठेवण्याचा आम्हाला अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते नलिन कोहली यांनी दिली आहे.

उरी हल्ल्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केले होते. या हल्ल्यात डझनभर दहशतवादी मारले गेले होते.