27 January 2021

News Flash

भीम आर्मी, रवीश कुमार यांचं समर्थन करणारी १४ पेजेस बंद; भाजपाच्या तक्रारीनंतर फेसबुकची कारवाई

भाजपाच्या सांगण्यावरुनच फेसबुकने १७ पेजेस पुन्हा केली सुरु

फाइल फोटो

भारतीय जनता पार्टीने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी फेसबुकला एक यादी दिल्याची माहिती समोर आली आहे. भाजपाने दिलेल्या या यादीमध्ये ४४ भाजपाविरोधी पेजेसची नावं होती. भाजपाला विरोध करणाऱ्या आणि टीका करणाऱ्या या पेजेसवर बंदी घालण्याची मागणी पक्षामार्फत फेसबुककडे करण्यात आली होती. अपेक्षित नियमांचे पालन या पेजेसकडून केलं जात नाहीय असं भाजपाने म्हटलं होतं. तसेच या पेजेसवर तथ्यहीन माहिती शेअर केली जात असल्याचा दावाही भाजपाने केला होता. भाजपाने दिलेल्या यादीपैकी १४ पेजेस सध्या फेसबुकवर नसल्याचे ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. भाजपाने जी पेजेस बंद करण्याची मागणी केली होती त्यामध्ये भीम आर्टीचे अधिकृत अकाऊंट, ‘वी हेट बीजेपी’ पेज, काँग्रेसचे समर्थन करणारी काही पेजेसबरोबरच द ट्रूथ ऑफ गुजरात नावाच्या पेजचाही समावेश होता. भाजपाने तक्रार केल्यानंतर जी पेजेस बंद करण्यात आली त्यामध्ये पत्रकार रवीश कुमार आणि विनोद दुआ यांचे समर्थन करणारी काही पेजेसही आहेत.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये भाजपाने फेसबुक इंडियाकडे आधी दिलेल्या यादीमधील १७ पेजेस पुन्हा सुरु करण्यात यावी अशी मागणी केली. त्याचबरोबर दोन न्यूज वेबसाईटला मॉनेटाइज करण्याची मागणीही भाजपाने केली. या दोन न्यूज वेबसाईटमध्ये चौपाल आणि ओपइंडिया या दोन वेबसाईटचा समावेश आहे. हा दोन्ही वेबसाईट भाजपाचे समर्थन करणारा मजकूर पोस्ट करण्यासाठी आणि उजव्या विचारसरणीच्या वेबसाईट म्हणून प्रसिद्ध आहेत. भाजपाच्या मागणीनंतर फेसबुकने १७ पेजेस पुन्हा सुरु केली. फेसबुकने भाजपाला दिलेल्या माहितीमध्ये ही पेजेस चुकून हटवण्यात आली होती. यासंदर्भात भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय आणि फेसबुक इंडियामध्ये इमेलवरुन चर्चा झाली होती.

चौपालचे संस्थापक विकास पांड्ये यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार फेसबुककडून कंटेट मॉनेटाइ करण्याला परवानगी देण्यात येत नव्हती. मार्च २०१९ मध्ये फेसबुकने या पेजवर मॉनेटायइजेशनवर बंदी घातली होती. पेज मॉनेटायझेशनवर बंदी घातल्यानंतर पेजवरील कंटेटंमधून आर्थिक फायदा मिळवण्यात अडचणी निर्माण होतात. चौपालने २०१८ पासून आतापर्यंत राजकीय जाहिरातबाजीवर पाच लाखांहून अधिक खर्च केला आहे. ओपइंडियाचे दोन लाखांहून अधिक फॉ ोलअर्स असून त्यांनी मार्च ते जून २०१९ दरम्यान राजकीय जाहिरातींवर ९० हजार रुपये खर्च केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 9:52 am

Web Title: before 2019 polls bjp flagged 44 rival pages 14 now off facebook scsg 91
Next Stories
1 अमूल डेअरी निवडणूक : ११ पैकी ८ जागांवर काँग्रेसचा विजय
2 दिल्लीला मागे टाकत पुणे बनलं करोनाबाधितांची राजधानी; देशातील रुग्णसंख्या ३६ लाखांच्या पार
3 …तर भारताची १९६२ पेक्षा जास्त मोठी हानी करू, चीनची धमकी
Just Now!
X