04 March 2021

News Flash

बैरूतचा धडा: चेन्नई जवळ असलेला ६९७ टन अमोनियम नायट्रेटचा साठा लावला मार्गी

स्फोटक केमिकलचा ई-लिलाव...

मागच्या आठवड्यात लेबनॉनचे बैरुत शहर अमोनियम नायट्रेटच्या महाभयंकर स्फोटांनी हादरले होते. यामध्ये शेकडो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक जखमी झाले. बैरुतमध्ये एका गोदामात हा अमोनियम नायट्रेटचा साठा करुन ठेवण्यात आला होता. बैरुतमधील या घटनेनंतर भारताच्या चेन्नई शहरातही एका गोदामामध्ये असाच काहीशे टन अमोनियम नायट्रेटचा साठा असल्याचे समोर आले होते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही चिंतेची बाब होती.

बैरुतच्या दुर्घटनेपासून योग्य तो बोध घेत, चेन्नईतील अमोनियम नायट्रेटचा साठा मार्गी लावण्यात आला आहे. चेन्नईतील स्फोटक केमिकलचा ई-लिलाव झाला असून हा साठा आता हैदराबादला पाठवण्यात येत आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. चेन्नईत हा अमोनियम नायट्रेटचा साठा जिथे होता, त्याच्या आसपास जवळपास १२ हजारची लोकवस्ती आहे.

चेन्नईजवळ एका कंटेनरमध्ये ६९७ टन केमिकल ठेवण्यात आले होते. केमिकलने भरलेले काही कंटेनर आधीच हैदराबादच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुरक्षिततेची सर्व काळजी घेऊन उर्वरित केमिकलही कार्गोने पाठवण्यात येईल असे पोलिसातील सूत्रांनी सांगितले. कस्टम कायदा १९६२ अंतर्गत २०१५ साली हा केमिकलचा पदार्थ जप्त करण्यात आला होता. चेन्नईपासून २० किमी अंतरावर असलेल्या फ्राईट स्टेशनमध्ये अमोनियम नायट्रेटन भरलेले कार्गो ठेवण्यात आले होते.

तामिळनाडूतील एका आयातदाराकडून हे केमिकल जप्त करण्यात आले होते. त्याने रासायनिक खत पदार्थ असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात तपासणीमध्ये स्फोटक केमिकल निघाले असे कस्टमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चार ऑगस्टला लेबनॉनमध्ये २,७५० टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट झाला. १३५ लोकांचा मृत्यू झाला तर ४ हजार नागरिक जखमी झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 8:55 am

Web Title: beirut blasts explosive chemical stored near chennai being moved to hyderabad dmp 82
Next Stories
1 सुन्नी बोर्ड अयोध्येमधील कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगींना आमंत्रित करण्याची शक्यता
2 करोना संकटात दिलासा देणारी बातमी, उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५ लाखांच्या पुढे
3 संरक्षण क्षेत्रात स्वदेशी
Just Now!
X