पश्चिम बंगालमधील एक धक्कादाय प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीला राक्षस असल्याचे सांगून दोन्ही हाताची बोटे कापून टाकली आहे. काळी जादू करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. फंदी सरकार असे पीडित व्यक्तीचे नाव आहे.

पश्चिम बंगालमधील शांतीनिकेतनमध्ये एक ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीला कंगारू कोर्टमध्ये राक्षस असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शिक्षा म्हणून मंगळवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी त्याच्या हाताची दहा बोटे कापण्यात आली. भविष्यात कोणतेही राक्षसी कृत्य करू नये म्हणून त्याला ही शिक्षा देण्यात आली आहे. पोलिसांनी संबधीत पाच आरोपींना अटक केली आहे. धक्कादाय म्हणजे या पाच आरोपीमध्ये त्या ७३ वर्षीय व्यक्तीच्या मुलगा हरिषचाही समावेश आहे.

फंदी सरकारच्या शेजारी राहण्याऱ्यांनी त्याच्यावर राक्षसी कृत्य आणि काळी जादू करत असल्याचा आरोप केला होता. फंदी सरकारच्या राक्षसी कृत्यामुळे गावांमध्ये रोगराई पसरत होती. त्यामुळे लोक सतत आजारी पडत होते. कंगारू कोर्टाने फंदी सरकारला सम्नसही पाठवला होता. त्यानंतर कंगारू कोर्टाने शिक्षा सुनावली.

‘फंदी सरकारच्या मुलाने कंगारू कोर्टमध्ये वडिलांच्या शिक्षेबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर कोर्टाने मुलालाही हाताची बोटे तोडण्याची शिक्षा दिली. घाबरलेला मुलगा कंगारू कोर्टाच्या दबावात आला. त्यानंतर कोर्टाने त्याला वडिलांची बोटे तोडण्याची शिक्षा दिली.’ अशी माहिती स्थानिक पोलिस आधिकाऱ्याने दिली आहे.