23 April 2019

News Flash

मुलीवरुन मित्रांमध्ये वाद; चौथ्या मजल्यावरुन ढकलल्याने तरुणाचा मृत्यू

अहमदाबादमध्ये राहणारे रॉयल चौधरी, रौनक आणि अपूर्वा चौधरी हे तिघे बेंगळुरुतील नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होते.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुलीवरुन झालेल्या वादातून २३ वर्षांच्या तरुणाला त्याच्या मित्रानेच चौथ्या मजल्यावरुन धक्का दिल्याची घटना बेंगळुरुत घडली. या घटनेत त्या तरुणाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी रॉयल चौधरी (वय २३) याला अटक केली आहे.

अहमदाबादमध्ये राहणारे रॉयल चौधरी, रौनक आणि अपूर्वा चौधरी हे तिघे बेंगळुरुतील नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होते. परीक्षेसाठी ते तिघे बेंगळुरुत आले होते आणि विशाला रेसिडन्सी या हॉटेलमध्ये त्यांचे वास्तव्य होते. परीक्षा झाल्यानंतर तिघेही हॉटेलमध्ये गप्पा मारत बसले होते. यादरम्यान त्यांचा आणखी एक मित्र खोलीत आला. तो देखील परीक्षेसाठी अहमदाबादवरुन बेंगळुरुत आला होता.

गप्पा सुरु असताना एका मुलीचा विषय निघाला. ती मुलगी रॉयल आणि रौनक या दोघांनाही आवडायची. यावरुन दोघांमध्येही वाद झाला. खोलीतील अन्य दोघांनी हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने रौनक खोलीतील बाल्कनीत गेला. रॉयलही त्याच्या मागे गेला. बाल्कनीत दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि यादरम्यान रॉयलने रौनकला धक्का दिला. यामुळे रौनक चौथ्या मजल्यावरुन खाली कोसळला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी रॉयलविरोधात सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

First Published on August 10, 2018 11:53 pm

Web Title: bengaluru 23 year old nursing student pushed from fourth floordies friend booked