26 September 2020

News Flash

धक्कादायक ! पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिला पत्रकारासमोर केलं अश्लील कृत्य, गुन्हा दाखल

स्कूटरवरुन आलेल्या एका व्यक्तीने रस्त्यात महिलेसमोर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. स्कूटरवरुन आलेल्या एका व्यक्तीने रस्त्यात एका महिलेसमोर स्कूटर थांबवून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

‘बँगलोर मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका ३१ वर्षीय पत्रकार महिलेने याप्रकरणी राममूर्ती नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सुपरमार्केटमधून घरी परतत असताना स्कूटरवरुन आलेला एक व्यक्ती तिच्यासमोर थांबला. त्या व्यक्तीने मास्क आणि हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे त्याचा चेहरा दिसला नाही. महिलेच्या हातात सामान होतं. त्याने तिला एक पत्ता विचारला, त्याने विचारलेला पत्त्यावर कोणत्या दिशेने जायचं हे ती महिला सांगत असतानाच तो माणूस हस्तमैथुन करत असल्याचं तिच्या लक्षात आलं. महिला त्याच्यावर जोरात ओरडली, त्यानंतर तो स्कूटर घेवून पळून गेला.

आणखी वाचा- पोलीस स्थानकातला धक्कादायक प्रकार, तक्रारीसाठी आलेल्या महिलेसमोरच अधिकाऱ्याने…

घटना घडली त्यावेळी रस्त्यावर गर्दी नव्हती असंही त्या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी मिळवले असून त्यावरुन आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपीला ताब्यात घेतलं जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:36 pm

Web Title: bengaluru man on scooter asks for address then flashes at woman journalist sas 89
Next Stories
1 एकीकडे चीनची आगळीक, दुसरीकडे पाकने सीमेवर पाठवले २० हजार अतिरिक्त सैनिक
2 वीज पडल्याने जखमी झालेल्यांना उपचारासाठी चक्क शेणात गाडलं अन्…
3 कराची स्टॉक एक्सचेंज हल्ल्यासाठी पाकिस्तानने भारताला धरलं जबाबदार
Just Now!
X