News Flash

बेंगळुरुत सरावादरम्यान दोन विमानं कोसळली, वैमानिकाचा मृत्यू

एअर शोच्या पार्श्वभूमीवर सराव करत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक नागरिक देखील जखमी झाला आहे.

कर्नाटकातील बेंगळुरु येथील एअर शोपूर्वी मंगळवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. एअर शोसाठी सराव करत असताना दोन सूर्यकिरण विमानांमध्ये टक्कर झाली. यालहंका एअरबेसवर ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

यालहंका एअरबेसवर बुधवारपासून एअर शोला सुरुवात होणार आहे. या एअर शोमध्ये विमानांच्या चित्तथरारक हवाई कसरती पाहायला मिळतील. यापार्श्वभूमीवर मंगळवारी विमानांचा सराव सुरु होता. सरावासाठी उड्डाण घेत असताना दोन सूर्यकिरण विमानांची टक्कर झाली. यानंतर दोन्ही विमान एअरबेसच्या आवारातच कोसळली. या दुर्घटनेत एका वैमानिकाचा मृत्यू झाला.

बेंगळुरु पोलिसांनी या दुर्घटनेबाबत माहिती दिली आहे. ‘एअर शोच्या पार्श्वभूमीवर सराव करत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एक नागरिक जखमी झाला आहे’, असे पोलिसांनी सांगितले.

सूर्यकिरण ही भारतीय हवाई दलातील एक तुकडी असून या विमानांचा वापर हवाई कसरतींसाठी केला जातो. १९९६ ते २०११ दरम्यान या विमानांचा वापर केला गेला. यानंतर २०१५ मध्ये या विमानांमध्ये दुरुस्ती करुन त्यांचा पुन्हा वापर सुरु झाला. या ताफ्यात सध्या नऊ विमाने आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 12:13 pm

Web Title: bengaluru two aircraft of the surya kiran aerobatics team crash yelahanka airbase
Next Stories
1 ‘एक कानशिलात लगावल्यानंतर मसूद अझहर घडाघडा बोलू लागला’
2 शस्त्र हाती उचलणाऱ्यांचा खात्मा करणारच; भारतीय सैन्याने ठणकावले
3 डिझेलमधून इलेक्ट्रिकमध्ये रुपांतरीत केलेल्या जगातल्या पहिल्या रेल्वे इंजिनचे लोकार्पण
Just Now!
X