26 February 2021

News Flash

विवाहित प्रेयसीने प्रियकराचे आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचे इंटिमेट फोटो मॉर्फ केले त्यानंतर….

महेशन त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोबाइल नंबर मिळवला व तिला मेसेज पाठवला. दोघांचे व्हॉट्स अ‍ॅपवर चॅटिंग सुरु झाले. त्यानंतर अनुश्रीने....

प्रियकराच्या एक्स गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करुन तिच्याकडून पैसे उकळणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेला अखेर बंगळुरु पोलिसांनी बुधवारी अटक केली. या प्रकरणातील आरोपी महिला अनुश्री विवाहित असून ती पती आणि मुलासोबत कालकेरे येथे राहते. अनुश्रीचा प्रियकर महेशही या प्रकरणात आधी संशयित होता. पण त्याचा यामध्ये सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला जाऊ दिले.

नेमकं काय आहे प्रकरण?
महेशची एक्स गर्लफ्रेंड कोलार येथे रहायची. कॉलेजमध्ये असताना त्यांचे प्रेमसंबंध होते. पण पुढे ते वेगळे झाले. महेशनच्या गर्लफ्रेंडचा ११ वर्षांपूर्वी बंगळुरुमधल्या एका उद्योजकासोबत विवाह झाला. त्याचा एक मुलगाही आहे.
मधल्या काळात महेश आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड परस्परांच्या संपर्कात नव्हते. पण जुलै २०१९ मध्ये महेशन त्याच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोबाइल नंबर मिळवला व तिला मेसेज पाठवला. दोघांचे व्हॉट्स अ‍ॅपवर चॅटिंग सुरु झाले. त्यानंतर अनुश्रीने महेशच्या एक्स गर्लफ्रेंडचा मेसेज पाठवला. मी आता महेशची गर्लफ्रेंड आहे असे सांगून तिने तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर तिघांचे व्हॉट्स अ‍ॅपवर बोलणे सुरु झाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

काही दिवसांनी अनुश्रीने महेशच्या एक्स गर्लफ्रेंडला तिचे फोटो पाठवायला सांगितले. तिने विश्वास ठेवून अनुश्रीला फोटो पाठवले. त्यानंतर अनुश्रीने एकदिवस महेशच्या एक्स गर्लफ्रेंडला मेसेज केला, कॉलेजच्या दिवसातले तुमचे प्रणयाचे काही फोटोज आणि व्हिडीओ माझ्याकडे आहेत, असे सांगितले.  पुरावा म्हणून मॉर्फ केलेले फोटो सुद्धा तिने महेशच्या गर्लफ्रेंडला पाठवले. पैशांची मागणी पूर्ण केली नाही, तर ते फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची अनुश्रीने धमकी दिली. आपला संसार मोडेल म्हणून घाबरलेल्या महेशच्या एक्स गर्लफ्रेंडने अनुश्रीच्या मागणीनुसार पैसे पाठवायला सुरुवात केली. मागच्या दीड वर्षात तिने तब्बल १.३ कोटी रुपये अनुश्रीला पाठवले.

त्यानंतर अनुश्रीने १५ लाख रुपयांची मागणी केली. पण तो पर्यंत महेशच्या एक्स गर्लफ्रेंडचे अकाऊंट रिकामे झाले होते. तिने अनुश्रीचा नंबर ब्लॉक केला. या दरम्यान महेशच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नवऱ्याला एक बाब लक्षात आली. तिच्या खात्यातून ठराविक एका अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर झाल्याचे त्याला समजले. जेव्हा त्याने या बद्दल पत्नीला जाब विचारला. त्यावेळी तिने आपल्याला ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे सांगितले. पतीच्या सल्ल्यावरुन तिने पोलिसात तक्रार नोंदवली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 1:00 pm

Web Title: bengaluru woman extorts rs 1 3 crore from boyfriends ex using morphed pics dmp 82
Next Stories
1 जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार; म्हणाले…
2 उमा भारती म्हणाल्या, “तेजस्वी यादव चांगले व्यक्ती, बिहारचं नेतृत्व करू शकतात; परंतु…”
3 अमेरिकेत काय होणार? ट्रम्पनी दिले बंडाचे संकेत, पेंटागॉनच्या नेतृत्वात केला बदल
Just Now!
X