News Flash

सुरक्षित शरीरसंबंधांचा आग्रह धरला म्हणून महिलेची हत्या

मृत महिला पतीपासून विभक्त झाली होती. ती तिच्या अल्पवयीनमुलासोबत राहत होती.

देहविक्री करणाऱ्या महिलेची ग्राहकानेच हत्या केली. महिलेने ग्राहकाकडे सुरक्षित शरीरसंबंधांचा आग्रह धरला होता. महिलेची ही मागणी ग्राहकाला मान्य नव्हती. त्याने पैसे दिले होते. त्या वादातून ग्राहकाने महिलेची थेट हत्या केली. बंगळुरुमध्ये ही घटना घडली. आरोपी एका खासगी कंपनीत कामाला असून बुधवारी त्याला अटक करण्यात आली. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

मृत महिला पतीपासून विभक्त झाली होती. ती तिच्या अल्पवयीनमुलासोबत राजाजीनगरमध्ये राहत होती. मॅजेस्टीक येथे दुपारी एकच्या सुमारास आरोपीबरोबर तिची भेट झाली. शरीरसंबंध ठेवण्यासाठी ग्राहकाकडे तिने अडीजहजार रुपयांची मागणी केली. अखेर १५०० रुपयांचा व्यवहार ठरला. अॅडव्हान्स म्हणून तिने पाचशे रुपये घेतले.

राजाजीनगर येथे महिलेच्या घरी जाण्यासाठी दोघांनी बस पकडली. महिलेला आधी पाचशे आणि घरी पोहोचल्यानंतर १ हजार रुपये दिले. सुरक्षित शरीरसंबंधांसाठी तिने ग्राहकाला कंडोम घालायला सांगितला. पण ग्राहकाने नकार दिला व त्याने पैसे परत मागितले. तिने पैसे परत करण्यास नकार दिला.

सुरक्षिततेशिवाय शरीरसंबंध ठेवल्यास आरडाओरडा करीन अशी तिने धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी ग्राहकाने त्याच्या बॅगेतून चाकू काढला व पैसे परत केले नाहीत तर, भोसकण्याची धमकी दिली. ही वादावादी सुरु असताना आरोपीने तिला चाकूने भोसकले व तिचा गळा चिरला. महिलेचा मुलगा शाळेतून पावणेचारच्या सुमारास घरी आल्यानंतर या महिलेची हत्या झाल्याचे समजले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीला शोधून काढले व त्याला अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 4:16 pm

Web Title: bengaluru woman insists on safe sex man kills her dmp 82
Next Stories
1 भारतात मार्केटिंगवर फेसबुकचा भर, मार्केटिंग प्रमुखपदी अविनाश पंत यांची नियुक्ती
2 कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी १० दिवसात चीन बांधणार हॉस्पिटल
3 मोदी सरकारने हटवली शरद पवारांची सुरक्षा
Just Now!
X