19 October 2019

News Flash

दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आईला पेट्रोल टाकून पेटवले

गंभीर जखमी असलेल्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरु येथे एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. २० वर्षांच्या एका युवकाने फक्त पैसे देण्यास नकार दिल्याने आपल्या आईलाच पेटवले.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरु येथे एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. २० वर्षांच्या एका युवकाने दारुसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने आपल्या आईलाच पेटवले. गंभीर जखमी असलेल्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी पसार झाला असून उत्तम कुमार असे त्याचे नाव आहे. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून उत्तम कुमारचा शोध घेतला जात आहे. दारुसाठी आईलाच पेटवून दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बेंगळुरु येथील सदाशिवनगर परिसरातील ६ डिसेंबरची ही घटना आहे. पैशांवरुन आई आणि मुलामध्ये वाद झाला होता. संशयित आरोपी उत्तम कुमारने आईला पैसे मागितले. पण दारु पिण्यासाठी पैसे देण्यास आईने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या उत्तम कुमारने आईवर पेट्रोल टाकले आणि पेटवून दिले. जखमी अवस्थेत असलेल्या आईला त्याच्या वडिलांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत आईचा चेहरा, हात आणि छातीला गंभीर दुखापत झाली आहे.

तत्पूर्वी, बेंगळुरु येथे शेजाऱ्यांच्यासमोर रागावल्यामुळे चिडून एका व्यक्तीने आपल्या आईला झाडूने मारहाण केली होती. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता.

First Published on December 10, 2018 2:19 pm

Web Title: bengaluru youth set ablaze his mother for not giving him money to buy alcohol