इस्रायलचे पंतपधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी अण्वस्त्रधारी इराण हा केवळ इस्रायलच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या शांततेसाठी धोका ठरू शकतो, असे अमेरिकी लोकप्रतिनिधीगृहाच्या संयुक्त  बैठकीतील भाषणात केले.
व्हाइट हाऊसच्या परवानगीशिवाय हे भाषण आयोजित केल्याबद्दल त्यावर वादंग माजले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी नेतान्याहू यांना परस्पर आमंत्रण धाडले. याची पूर्वकल्पनादेखील अध्यक्ष बराक ओबामा यांना दिली गेली नाही.
इस्रायलमध्ये मुदतपूर्व निवडणुकांत १७ मार्च रोजी मतदान होईल. नेतान्याहू यांनी आपली ही भेट ऐन निवडणुकीच्या तोंडावर आखली. त्यामुळे नेतन्याहू यांना प्रचाराची संधी मिळाल्याचा दावा केला जात आहे.
या भाषणाच्या निर्णयामुळे नेतान्याहू यांच्यावर खुद्द इस्रायलमध्ये टीकेची झोड उठली.