News Flash

…तोच चांगला न्यायाधीश; सरन्यायाधीशांनी सांगितलं वैशिष्ट्यं

सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांच्या ‘अ‍ॅनोमलीज इन लॉ अ‍ॅण्ड जस्टिस’ या पुस्तकाचे अनावरण केले.

एन.व्ही. रमण यांनी अनेक विषयावर भाष्य केले

सर्वोत्कृष्ट न्यायाधीश तो आहे जो माध्यमांमध्ये कमी दिसतो आणि त्याला तेथे ओळखणारे लोक कमी असतात असे भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी शनिवारी म्हटले. सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर. व्ही. रवींद्रन यांचा “सर्वोच्च न्यायालयातील प्रतिष्ठा वाढविणाऱ्या महापुरुषांपैकी एक” म्हणून उल्लेख करताना त्यांना प्रख्यात इंग्रजी न्यायाधीश लॉर्ड अल्फ्रेड डेनिंग यांचे हे शब्द आठवले.

सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती (निवृत्त) आर. व्ही. रवींद्रन यांच्या ‘अ‍ॅनोमलीज इन लॉ अ‍ॅण्ड जस्टिस’ या पुस्तकाचे अनावरण केले. या पुस्तकात, सोप्या शब्दात, कायद्यातील विविध उणीवा दूर करण्याची आवश्यकता स्पष्ट केली गेली आहे.

यावेळी बोलताना सरन्यायाधीश रमणा यांनी उच्च न्यायालयात नियुक्त झाल्यावर माजी न्यायाधीशांनी त्यांना लिहिलेले अभिनंदन पत्र वाचून दाखवले. पत्रात न्यायमूर्ती रवींद्रन यांनी असे म्हटले होते की, हे “कठीण”, “आव्हानात्मक” दिवस होते, सरन्यायाधीश असल्याने याचा सामना करण्याचे धैर्य असणे आवश्यक होते आणि आणि न्यायाधीश रमणा यांच्याकडे न्यायाधीशांकडून अपेक्षित असलेले सर्व गुण होते. “मला वाटतं की हा संदेश खरोखरच भारताचा सरन्यायाधीश बनण्यासाठी माझ्यासाठी मार्गदर्शक ठरला. मी या संदेशाला कायमच मौल्यवान म्हणून ठेवेन, असे सरन्यायाधीश म्हणाले.

करोना काळात व्हर्च्युअल न्यायालयीन कामकाजावेळी येणाऱ्या अडचणींबाबत डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या अडचणी दूर करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहिले आहे असे सरन्यायाधिशांनी यावेळी सांगितले.

या डिजिटल विभाजनामुळे वकीलांची एक संपूर्ण पिढी बाहेर ढकलली जात आहे, असे सरन्याधिशांनी सांगितले. त्यांनी कबूल केले की डिजिटल दरीमुळे न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होत आहे, विशेषत: ग्रामीण भागात, कारण करोनाचा उद्रेक झाल्यापासून न्यायालये व्हर्च्युअली कार्यरत असल्याने हा परिणाम झाला आहे. न्यायालयीन काम करणाऱ्यांचे फ्रंन्टलाईन वर्कर म्हणून लसीकरणाला प्राधान्य देण्यावरही त्यांनी चर्चा केली असेही ते म्हणाले.

माजी मुख्य न्यायाधीश एम.एन. वेंकटाचलैया, सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण आणि ज्येष्ठ वकील अरविंद दातार यांनीही व्हर्च्युअल पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 5:06 pm

Web Title: best judge is the one who is rarely seen in the media and there are few who know him there says india chief justice n v ramana said abn 97
Next Stories
1 Video: अमेरिकेतील न्यू मॅक्सिकोत हॉट एअर बलून हवेतच फुटल्याने ५ जणांचा मृत्यू
2 पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’ वर किरेन रिजिजू यांची विशेष प्रतिक्रिया, म्हणाले…
3 स्पर्धा परीक्षेतील उमेदवाराला द्यावी लागणार नाही मुलाखत; ‘या’ राज्याने घेतला निर्णय
Just Now!
X