देशात चोवीस तासांतील करोनाच्या संसर्गाबाबतची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये नव्या बाधित रुग्णांच्या तुलनेत उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकूणच देशभरात करोनाचा प्रभाव कमी होत असल्याचे चित्र आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशाच गेल्या चोवीस तासांत ४३,८९३ नवे रुग्ण आढळून आले. तर ५८,४३९ रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ७९,९०,३२२ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ५०८ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या १,२०,०१० वर पोहोचली आहे.

त्याचबरोबर गेल्या चोवीस तासांत १५,०५४ अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्याने देशात सध्या एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६,१०,८०३वर पोहोचली आहे.