भागलपूरमधील नाथनगर पोलीस ठाणे या मुस्लीमबहुल भागांत भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल मिरवणुकीत जातीय चकमक झडल्यानंतर दोन दिवसांनी केंद्रीय राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांचा पुत्र अरजित शाश्वत आणि अन्य आठ जणांविरुद्ध दंगल आणि हिंसाचाराला चिथावणी देण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या परिसरातील १० नागरिकांविरुद्ध शस्त्रे बाळगल्याबद्दल त्याचप्रमाणे गोळीबार केल्याबद्दल दुसरा एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आम्ही दोन स्वतंत्र एफआयआर नोंदविले आहेत. पहिला एफआयआर अरिजित शाश्वत आणि आठ जणांविरुद्ध नोंदविण्यात आला आहे. मोटारसायकल रॅलीसाठी त्यांनी परवानगी घेतली नव्हती, प्रशासनाने परवानगी दिली असती तर रॅलीचा मार्गही निश्चित केला असता, असे भागलपूरचे पोलीस उपमहानिरीक्षक विकास वैभव यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.