भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘हमरो सिक्कीम पार्टी’ असं त्याच्या पक्षाचं नाव आहे. सिक्कीमच्या समस्या दिल्लीपर्यंत पोहोचत नाहीत. युवकांची टीम बांधून सिक्कीमच्या विकासासाठी काम करु आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देऊ असं यावेळी भुतियाने म्हटलं.

२०१४ मध्ये बायचुंग भुतियाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडणूकही लढवली, पण निवडणुकीत एस.एस. अहलुवालीया यांनी त्याचा पराभव केला. फेब्रुवारीमध्ये त्याने तृणमूल काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. दुस-या राज्यातून निवडणूक लढवल्यामुळे जेवढं हवं तेवढं समर्थन मिळालं नाही. सिक्कीममध्ये राहात असल्याने पक्षासाठी स्वतःचं कर्तव्य पार पाडता येत नव्हतं असं उत्तर भुतियाने तृणमूल सोडण्याच्या प्रश्नावर दिलं.