मराठी पांडुरंग सांगवीकरच्या देशीबाजपणाचे स्वागत करणाऱ्या हिंदी साहित्यविश्वाला आता प्रतीक्षा आहे ती ‘हिंदू’ची. हिंदी साहित्यरसिकांची ही प्रतीक्षा येत्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात संपणार आहे.भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू : एक समृद्ध अडगळ’ची हिंदी आवृत्ती १४ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात प्रकाशित होणार असल्याची माहिती राजकमल प्रकाशनचे कार्यकारी संचालक अशोक महेश्वरी यांनी दिली. याशिवाय २७ फेब्रुवारीला राजकमल प्रकाशनला ६५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भालचंद्र नेमाडे यांचे ‘भारतीयता और हिंदुत्व’ या विषयावर दिल्लीत व्याख्यान होणार आहे.
सन्मानाची समृद्ध अडगळ
श्रेष्ठ कादंबरीकाराचा यथोचित सन्मान
‘आता कविता लेखन करणार’!
कोसला ते हिंदू व्हाया देशीवाद
ज्ञानपीठ म्हणजे काय रे भाऊ?
राजकारणाला न जुमानता नेमाडेंना ज्ञानपीठ
विशेष संपादकीय – तुकारामांच्या मराठीचा गौरव!
‘राजकमल’चे संपादकीय संचालक सत्यानंद निरुपम म्हणाले की, नेमाडे यांच्या ‘हिंदू’विषयी हिंदी वाचकांमध्ये उत्सुकता आहे. ‘कोसला’ने हिंदीत नवे मापदंड प्रस्थापित केले नेमाडे यांच्या झूल व बिढारची एकत्रित हिंदी आवृत्ती २००३ मध्ये प्रसिद्ध झाली होती. एखाद्या उच्चतम प्रादेशिक कलाकृतीला पुरस्कार असो अथवा नसो त्या कलाकृतीची चर्चा हिंदीत होते. लेखनाचे श्रेष्ठत्व पुरस्काराने ठरत नाही. तर नवे मापदंड प्रस्थापित केल्याने ठरते. भाषेने साहित्याचा प्रवाह बदलतो. नेमाडे हे प्रवाह बदलणारे लेखक आहेत. नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यास विलंब झाल्याची खंत निरुपम यांनी व्यक्त केली. नेमाडे यांना ‘ज्ञानपीठ’ देणे हा पुरस्कार देणाऱ्या संस्थेचा सन्मान आहे. प्रादेशिक भाषांमधील लेखक गिरीश कर्नाड, अनंतमूर्ती, महाश्वेतादेवी यांची पुस्तके राजकमल प्रकाशनने हिंदीत आणली. आता नेमाडे यांची ‘हिंदू’ येत आहे. त्यानंतर जरीला आणि हूल या कादंबऱ्यांचा हिंदी अनुवाद येत्या वर्षअखेर प्रसिद्ध होईल, असे निरुपम यांनी सांगितले.