News Flash

VIDEO: ‘पेट्रोलची किंमत वाढवली पाहिजे’ अशी घोषणा देणाऱ्याला मारहाण

हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे

बेळगावमधील आंदोलन

आज देशभरामध्ये विरोधी पक्षांनी इंधन दरवाढी विरोधात भारत बंदची हाक दिली आहे. अनेक राज्यांमधील विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या दरवाढीचा विरोध करत आहेत. देशात अनेक ठिकाणी या आंदोलनादरम्यान तोडफोड आणि जळपोळीच्या घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. इतर राज्यांप्रमाणे कर्नाटकमध्येही दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टी म्हणजेच ‘आप’ने या आंदोलनात उडी घेतली आहे. कर्नाटकमध्येही आपच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधात आंदोलन केले. मात्र येथील आंदोलन एका वेगळ्याच कारणामुळे सध्या सोशल मिडियावर गाजत आहे.

बेळगावमधील आपच्या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते आणि नेते रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध करत होते. याच वेळी घोषणाबाजी सुरु असताना एका कार्यकर्त्याने ‘पेट्रोलची किंमत…’ असा नारा दिला. तो पुढे पुरा करताना एक कार्यकर्त्याने, ‘वाढवली पाहिेजे.’ अशी घोषणा दिली. त्यामुळे संतापलेल्या आपच्या नेत्याने उलट अर्थाची घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला चारचौघात कानाखाली लगावली. त्यानंतर त्याने जोरात ओरडून त्या कार्यकर्त्याला त्याची चूक लक्षात आणून देत, पेट्रोलची किंमत वाढवली नाही कमी केली पाहिजे. पेट्रोलची किंमत अशी घोषणा दिल्यावर तू कमी केली पाहिजे असं म्हटलं पाहिजे असं या नेत्याने कार्यकर्त्याला सांगितले.

एकीकडे देशभरात आंदोलन सुरु असताना सोशल नेटवर्किंगवर याच व्हिडीओची चर्चा आहे. अनेकांनी आपच्या या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर टिका केली आहे. तर बऱ्याच जणांनी या व्हिडीओवर मजेशीर शेरेबाजी केली आहे. न्यूज नाईने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. पाहुयात काय म्हणाले आहेत नेटकरी…

लोकं भाड्याने आणल्यावर असचं होणार

चला या दरात घ्या…

आपचे नेते म्हणजे मनोरंजन हे समीकरणच झालयं जणू

राष्ट्रीय स्तरावरील या आंदोलनामध्ये आपने काँग्रेसच्या बाजूने उभा राहण्याच निर्णय घेत इंधन दरवाढीला विरोध असल्याचे जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 4:23 pm

Web Title: bharat bandh aap leader slaps party worker for his mistake
Next Stories
1 नीरव मोदीची बहिण पूर्वीविरोधातही इंटरपोलने जारी केली रेड कॉर्नर नोटीस
2 राजस्थान पाठोपाठ आंध्र प्रदेशकडूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात २ रूपयांची कपात
3 जनक्षोभ उसळेल इतकेही इंधन दर नकोत, सुब्रमण्यम स्वामींचा भाजपाला घरचा अहेर
Just Now!
X