तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली. आज सर्वत्र बंद पाळला जात असून, याचे अनेक शिक्षण क्षेत्रातही परिणाम झाले आहे. अनेक विद्यापीठांनी आज होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. देशपातळीवरील काही परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून, नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
भारत बंदमुळे अनेक राज्यांमधील विद्यापीठाच्या वतीने आज घेण्यात येणाऱ्या परीक्षांवर परिणाम झाला आहे. यात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचाही समावेश आहे. काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, काही परीक्षांच्या सुधारित तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
ICAI CA Foundation Examinations Postponement : भारत बंदमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस् ऑफ इंडिया अर्थात ICAIच्यावतीने घेण्यात येणारी सीए फाऊंडेशन परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूटकडून परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली असून, १३ डिसेंबर रोजी परीक्षा घेतली जाणार आहे.
Important Announcement for November 2020 Examinations – Postponement of Foundation Examinations to be held on 8th Dec 2020 only to 13th Dec 2020 at the same venue with same timings. Admit Cards dowloaded will remain same.
For more details please visithttps://t.co/9qgxQxs6B6 pic.twitter.com/hkgN2T2Ss7— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai) December 7, 2020
उस्मानिया विद्यापीठानेही आज होणाऱ्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. मात्र, ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार होणार आहेत. आज स्थगित करण्यात आलेल्या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं विद्यापीठानं म्हटलं आहे.
ओडिशा लोक सेवा आयोगातर्फे राज्य सेवा मुख्य परीक्षा ८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार होती. मात्र, ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता ही परीक्षा पुढील वर्षात म्हणजे २ जानेवारी २०२१ रोजी घेतली जाणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 8, 2020 2:06 pm