27 February 2021

News Flash

कोव्हॅक्सिनला विरोध: भारत बायोटेकची घोषणा; साईड इफेक्ट झाल्यास देणार नुकसान भरपाई

लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस घेण्यास दर्शवला विरोध

(संग्रहित छायाचित्र)

जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरणाला भारतात आजपासून सुरुवात झाली. भारतात या लसीकरणासाठी सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आजच्या लसीकरणादरम्यान काही केंद्रांवर कोव्हॅक्सिनच्या लसीला विरोध झाल्याचे दिसून आले. यापार्श्वभूमीवर कोव्हॅक्सिन लस निर्मिती कंपनी भारत बायोटेकने घोषणा केली की, या लसीचे जर काही साईड इफेक्ट्स जाणवले तर कंपनी याची नुकसान भरपाई देईन. कोव्हॅक्सिनला भारत सरकारकडून ५५ लाख डोसची ऑर्डर मिळाली आहे.

कंपनीने एका पत्राद्वारे ही घोषणा करताना म्हटलं की, “कोणत्याही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल घटनेदरम्यान सरकारच्यावतीनं अधिकृत केंद्र आणि रुग्णालयांमध्ये चिकित्सिक स्वरुपात मान्यता प्राप्त मानकांनुसार, उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. जर लसीमुळे साईड इफेक्ट झाला तर कंपनीकडून याची भरपाई देण्यात येईल.”

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनने कोविड-१९ लसीविरोधात एंटीडोट उत्पन्न करण्याची क्षमता दाखवून दिली आहे. दरम्यान, कोव्हॅक्सिनच्या प्रभावीपणाची निश्चितता होणे अजून बाकी आहे. कारण, या लसीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल अजूनही सुरु आहे.

दरम्यान, लसीकरणादरम्यानच्या फॉर्ममध्ये म्हटलं आहे की, लस घेतली म्हणजे कोविड-१९ पासून बचावासाठी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचंपालन करणं बंद केलं जाईल, असं कोणी समजून नये. याचबरोबर लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट आणि एक फॉर्म देण्यात आला आहे. ज्याला लसीमुळे साईड इफेक्ट झाला आहे त्याने सात दिवसांच्या आत हा फॉर्म भरुन देणे आवश्यक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 6:21 pm

Web Title: bharat biotech announcement compensation will be given in case of side effects from covaxin vaccine aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 देशातील ‘या’ रुग्णालयातील डॉक्टरांनी नाकारली मेड इन इंडिया लस, ‘कोव्हिशिल्ड’ लसीला प्राधान्य
2 शाहनवाज हुसैन यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार!; भाजपाकडून नाव जाहीर
3 पहिली लस घेतल्यानंतर कोविड योद्ध्यांनी व्यक्त केल्या भावना; पाहा काय म्हणाले…
Just Now!
X