भारतात करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर विषाणू संक्रमणाचा धोका वैद्यकीय क्षेत्राकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणी करण्याची शिफारस तज्ञ समितीने केली होती. दरम्यान ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने कोव्हॅक्सिनच्या फेज II / III च्या क्लिनिकल चाचणीस मान्यता दिली. भारत बायोटेक ५२५ निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, पाटण्यातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूरची ‘मेडीट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’ या संस्थांमध्ये ५२५ मुलांवर या चाचण्या करण्यात येणार असून केंद्रीय औषध प्रमाणन नियंत्रण संस्थेच्या तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकच्या लसीच्या चाचण्या मुलांवर करण्याबाबत चर्चा केली होती.

भारत बायोटेकने २ ते १८ वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या करण्यासाठी परवानगी मागितली होती. सविस्तर चर्चेनंतर समितीने २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या सुरक्षेची माहिती जाहीर केल्यानंतर समिती तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांची शिफारस करणार आहे. लशीच्या मुलांवर चाचण्या करण्यावर २४ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली होती त्या वेळी कंपनीला सुधारित वैद्यकीय चाचण्या संचालन प्रक्रिया सादर करण्यास सांगण्यात आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat biotech covaxin test allowed on children between the ages of 2 and 18 srk
First published on: 13-05-2021 at 11:18 IST