News Flash

भारत कधीही ‘बंद’ नाही होणार, प्रगती सुरुच राहणार-भाजपा

भारत हा असा देश आहे जो कधीही बंद होणार नाही, या देशाची प्रगती सुरूच राहणार असे केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले

काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला काहीही अर्थ नाही. लवकरच महाआघाडीचा फुगाही फुटेल. भारत हा असा देश आहे जो कधीही बंद होणार नाही, या देशाची प्रगती सुरूच राहणार असे केंद्रीय मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. वाढत्या इंधन दरवाढीविरोधात आणि महागाईविरोधात काँग्रेसने बंदची हाक दिली आहे.

या बंदला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्तेत असलेल्या भाजपाने देशाने खूप नुकसान केले असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच विरोधी पक्ष आमच्याविरोधात आले हे चांगलेच झाले असे आता अशीच एकजुट करून आपण नरेंद्र मोदींना हटवू असे आवाहन राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केले. ज्यानंतर मुक्तार अब्बास नक्वी यांची ही टीका समोर आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 1:04 pm

Web Title: bharat will not be bandh it will keep moving and progressing says bjp
Next Stories
1 प्रेमाचं जाळं ! एक्स गर्लफ्रेंडने डोळ्यावर पट्टी बांधून कापला गळा
2 ‘पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, गॅसचे वाढते दर; याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन का?’
3 भाजपाचे अच्छे दिन संपले; वाचकांचा कौल
Just Now!
X