भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर, आज (रविवार) सकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. यावेळी संघाच्या नेत्यांसोबत भाजयूमोचे राष्ट्रीय अध्यक्ष अनुराग ठाकूर उपस्थित राहिले.
लोकसभा निवडणुकीतील प्रचारयंत्रणा आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी सिंग सरसंघचालकांच्या भेटीला गेल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीनंतरच्या रणनिती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, मोदी यांनी संघाचे वरिष्ठ नेते सुरेश सोनी, दत्तात्रय हौसबोली आणि भैय्याजी जोशी यांच्यासह सरसंघचालकांची भेट घेतले. तब्बल दोन तास चाललेल्या या भेटीत यूतीचे सरकार आल्यावर पक्ष संघटनेत कुणाला स्थान द्यायचे आणि कुणाला मंत्रीपद बहाल करायचे यासंबंधी चर्चा झाली असल्याचे नाकारून चालणार नाही. काही दिवसांपूर्वीच उमा भारती आणि मुरलीमनोहर जोशी यांनीदेखील सरसंघचालकांची भेट घेतली आहे.