करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी लवकरच सुरु होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी जाहीर केले.

“ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ, गोरखपूरमध्ये भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सी’न लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होईल” अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

व्हायरससमोर हतबल असलेली अमेरिकाच जगात सर्वातआधी होऊ शकते करोनामुक्त कारण…

भारत बायोटेकने इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (ICMR) सोबत मिळून कोव्हॅक्सीन लशीची निर्मिती केली आहे. दरम्यान काँग्रेस नेते दीपक सिंह यांनी गुरुवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले व उत्तर प्रदेशात करोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची विनंती केली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, उत्तर प्रदेशात ६१,६९८ करोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तीन लाख दोन हजार ६८९ रुग्ण करोनानुक्त झाले आहेत, तर ५,२९९ मृत्यू झाले आहेत.