‘आप’चा ताप काही कमी होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. पक्षाचे आमदार विजयकुमार बिन्नी यांच्या बंडाळी नंतर आनखी एक ‘आप’ आमदार त्यांच्याच पक्षावर टीका करत समोर आले आहेत. दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती प्रकरण सध्या गाजत आहे. या प्रकरणामुळे मंगळवारी खुद्द मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये एल्गार पुकारला होता. दिल्लीच्या प्रभारी राज्यपालांच्या आश्वासना नंतर केजरीवाल यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, पक्षाचेच आमदार व एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन जी. आर. गोपिनाथ यांनी दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी देखील पद सोडण्याची मागणी केली आहे.
गोपिनाथ याच्या मते ज्या प्रकारे दिल्ली सरकारने त्या चार पोलिसांवर कारवाईची मागणी केली त्याच प्रकारे पक्षाने निष्पक्ष चौकशीसाठी सोमनाथ भारती यांना देखील पदावरून हटवणे योग्य ठरेल. चौकशी दरम्यान भारती पदावर कायम राहिल्यास चौकशी प्रभावीत होण्याची शक्यता गोपिचंद यांनी बोलून दाखवली.
त्या चार पोलिसांना चौकशी दरम्यान निलंबित करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे. कारण ते पदावर कायम राहिले तर चौकशीवर त्याचा परिणाम होईल. तोच नियम मंत्री भारती यांना देखील लागू होतो. म्हणून पोलिसांबरोबर सोमनाथ भारती यांना देखील निलंबित करणे आवश्यक आहे,” असे गोपिचंद यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.