28 February 2021

News Flash

भीमा कोरेगाव प्रकरण : औरंगाबादेतील हिंसाचाराच्या तपासासाठी पोलीसांची समिती स्थापन

एसआयटीकडून चौकशी होणार

(संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

औरंगाबाद : भिमा कोरेगाव दंगल प्रकरणानंतर औरंगाबाद शहरात तीव्र पडसाद उमटले. यामध्ये अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. या घटनांच्या चौकशीसाठी औरंगाबादमधील पोलिस प्रशासनाकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एसआयटी नेमण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली. ही पाच सदस्यीय समिती असणार असून तिच्यामार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे आयुक्त यशस्वी यादव यांनी सांगितले. शहरात गदारोळ झाला तेव्हा आयुक्त सुट्टीवर होते. परतल्यानंतर त्यांनी ही समिती नेमली आहे.

भीमा कोरेगाव येथे झालेल्या प्रकरणानंतर शहरात दगडफेक, जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या दगडफेकीमुळे लाखो रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते, या दगडफेकीसाठी तरुणांना कोणी भडकवले होते का? यांसह इतर अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम ही समिती करणार आहे.

मुख्य पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. तसेच यामध्ये साहाय्यक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात, निरीक्षक शिवाजी कांबळे, उपनिरीक्षक तोडकर आणि कल्याणकर आदींचा समावेश आहे. या समितीने केलेल्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त यादव यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 9:06 pm

Web Title: bhima koregaon case police committee set up to investigate the violence in aurangabad
Next Stories
1 २०१७-१८ तील जीडीपीच्या दरात घटीचा अंदाज; मोदी सरकारसाठी मोठा झटका ?
2 तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत अडकले; सरकारकडे उरलेत मोजकेच पर्याय
3 या शहरातल्या हज हाऊसला भगवा रंग
Just Now!
X