28 February 2021

News Flash

‘आणीबाणीची घोषणा होणार आहे’; डाव्या विचारवंतांच्या अटकेवर अरुंधती रॉय यांची प्रतिक्रिया

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ नेते प्रकाश करात यांनी माध्यमांशी बोलताना या छापेमारीला लोकशाही अधिकारांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे.

अरुंधती रॉय (संग्रहित छायाचित्र)

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदप्रकरणी देशभरातून मंगळवारी विविध डाव्या विचारसरणीच्या लोकांवर अटकेची कारवाई करण्यात आली. या अटकसत्रावर नाराजी व्यक्त करताना ‘देशात आता आणीबाणी लागू होणार आहे’, अशी कडवी प्रतिक्रिया प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी दिली आहे.

अरुंधती रॉय म्हणाल्या, दिवसाढवळ्या लोकांच्या हत्या करणारे आणि जमावाकडून हत्या करणाऱ्यांवर देशात कारवाई होत नाही. तर वकिल, कवी, लेखक आणि दलितांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर आणि विचारवंतांच्या घरांवर छापेमारी आणि अटकसत्र सुरु आहे. भारत कुठे चालला आहे याचे हे द्योतक आहे. मारेकऱ्यांना आता सन्मानित केले जाईल तसेच त्यांचा आनंदही साजरा केला जाईल, तर न्याय आणि हिंदू बहुसंख्यांकांविरोधात जो बोलेल त्यांना गुन्हेगार बनवले जाईल.

आगामी निवडणुकांसाठी ही तयारी सुरु आहे. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही. याविरोधात आपल्याला एकत्र यावे लागेल अन्यथा ज्यावर आपल्याला गर्व आहे असे सर्वच प्रकारचे स्वातंत्र्य आपण गमावून बसू. देशातील ही स्थिती अगदी आणीबाणीची घोषणा होण्याच्या स्थितीसारखी आहे, अशी प्रतिक्रिया अरुंधती रॉय यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ नेते प्रकाश करात यांनी माध्यमांशी बोलताना या छापेमारीला लोकशाही अधिकारांवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. या लोकांवरील सर्व खटले त्वरीत मागे घेण्यात यावेत तसेच लवकरात लवकर त्यांची मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 7:33 pm

Web Title: bhima koregaon case renowned author activist arundhati roy likened the raids to the declaration of emergency
Next Stories
1 केरळमधील मंत्र्याचा ‘बाहुबली’ अवतार, पूरग्रस्तांसाठी खांद्यावरुन वाहून नेलं सामान
2 Aasam NRC Draft : मसुद्यात समावेश नसलेल्या १० टक्के नागरिकांची होणार पुनः पडताळणी
3 उमेदवारी मिळताच आपच्या आतिशी मारलेना यांनी बदलले आडनाव!
Just Now!
X