01 March 2021

News Flash

Bhima-Koregaon: काँग्रेस आग विझविण्याऐवजी भडकवण्याचं काम करतेय: अनंतकुमार

लोकसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

भीमा-कोरेगाव प्रकरणावरून आज लोकसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

भीमा-कोरेगाव प्रकरणावरून आज लोकसभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. भाजपाशासित राज्यात दलितांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केल्यामुळे भाजपानेही काँग्रेसवर आगपाखड केली. भीमा-कोरेगाव प्रकारणात काँग्रेस व राहुल गांधीना राजकारण करायचे आहे. आग विझविण्याऐवजी काँग्रेस ती भडकावण्याचे काम करत असल्याचा गंभीर आरोप संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी केला. काँग्रेसची ही खेळी देश सहन करणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

तत्पूर्वी, खरगे यांनी भाजपावर निशाणा साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशा विषयांवर मौन बाळगतात. पण मौनीबाबांनी यावर बोललेच पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली व भाजपाशासित राज्यात मागील काही वर्षांपासून दलितांवरील अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप केला. त्यांच्या या आरोपामुळे चिडलेल्या अनंतकुमार यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. महाराष्ट्र हे एक शांत व विकसित राज्य आहे. तिथे भडकावण्याचे काम केले जात असल्याचे ते म्हणाले.

लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही खरगे यांना फटकारले. खरगेंनी संसदीय भाषेचा वापर करावा, असे त्यांनी म्हटले. तुम्हाला दलितांचे भलंही नकोय आणि चर्चाही नकोय का, असा सवाल करत या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार आहे. त्यामुळे यावर खरगे यांनी जास्त भाष्य न करण्याची त्यांनी विनंतीही केली. दरम्यान, खरगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 2:13 pm

Web Title: bhima koregaon loksabha parliament affair minister anant kumar blame on congress
Next Stories
1 राज्यसभेसाठी अखेर ‘आप’ला उमेदवार मिळाले; ‘या’ तिघांना पाठवणार वरिष्ठ सभागृहात
2 Bhima-Koregaon: पंतप्रधान मोदी ‘मौनीबाबा’, संसदेत त्यांनी बोललेच पाहिजे: मल्लिकार्जुन खरगे
3 चारा घोटाळा: लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेवर उद्या सुनावणी
Just Now!
X