25 November 2020

News Flash

बिहार : मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजपा महिला नेत्याच्या पतीची गोळ्या झाडून हत्या

रस्त्यात थांबवून दोन हल्लेखोरांनी केला गोळीबार

फाइल फोटो

बिहारमधील भोजपुर जिल्ह्यामध्ये मतमोजणीच्या काही तास आधीच भाजपा महिला मोर्चाच्या नगराध्यक्षाच्या पतीवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टाऊन पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या सुंदरनगर परिसरामध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास बाईकवर आलेल्या हल्लेखोरांनी स्थानिक न्यायालयाच्या अधिवक्त्यावर गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांची प्रकृती आणखीनच बिघडल्याने त्यांना दुसरीकडे हलवण्याची तयारी करण्यात आली मात्र वाटेतच त्यांच्या मृत्यू झाला.

मृत व्यक्तीचे नाव प्रीतम नारायण सिंह असं आहे. प्रीतम यांच्या पत्नी शहरातील भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्या स्थानिक राजकारणामध्ये खूपच सक्रीय आहेत. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये त्या फारच सक्रीय होत्या. अगदी प्रचारापासून ते सभांपर्यंत महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्या काम करत होत्या.

या घटनेची माहिती मिळताच भोजपूरचे पोलीस अधिक्षक किशोर राय, एसडीओपी पंकज कुमार रावत यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि घडलेल्या घटनेचा तपशील जाणून घेतला. प्रीमत यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार प्रीतम हे बाईकवरुन घरी परत येत असतानाच त्यांना सुंदर नगर परिसरातील मंदिराजवळ दोन बाईकस्वार व्यक्तींना अडवले आणि त्यांची चौकशी करु लागले. प्रीतम हे त्यांच्याशी बोलत असतानाच अचानक त्यांनी प्रीतम यांच्यावर गोळीबार केला.

प्रीतम यांना दोन गोळ्या लागल्या. त्यापैकी एक डोक्यात तर दुसरी गोळी पाठीत लागली. प्रीतम आणि त्यांच्या भावाचा मागील एका वर्षापासून जमिनीच्या वाटपावरुन वाद सुरु असल्याची माहिती प्रीतम यांचा मुलगा प्रियदर्शी याने दिली. मात्र प्रीतम यांच्यावर गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार तपास सुरु असून या प्रकरणामध्ये लवकरच आम्ही दोषींना ताब्यात घेऊ असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणामध्ये सध्या तपासासाठी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 8:09 am

Web Title: bhojpur bihar election husband of bjp leader shot dead at ara just before counting scsg 91
Next Stories
1 Bihar Election Results : काँग्रेस-आरजेडीला लाडू पचणार नाहीत; शाहनवाज हुसैन यांची टीका
2 Bihar Election Results : एनडीए आणि महाआघाडीत चुरस
3 नोटबंदीचा उत्सव साजरा करणं म्हणजे उद्ध्वस्त लोकांच्या थडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखं : शिवसेना
Just Now!
X