पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात बनारस हिंदू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या पुनरुज्जीवनाची मागणी करणाऱ्या घोषणा देणाऱ्या एका विद्यार्थ्यांला काही जणांनी थापड मारली.

विद्यार्थ्यांनी फार मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार व जाळपोळ केल्यामुळे १९९७ साली बनारस हिंदू विद्यापीठाचा (बीएचयू) विद्यार्थी संघ बरखास्त करण्यात आला होता. या मुद्दय़ावर दबाव आल्यामुळे २००७-०८ साली विद्यार्थी परिषद स्थापन करण्यात आली. मात्र, विद्यापीठात नियमित विद्यार्थी संघटना असावी अशी अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे. पदवीदान समारंभात सोमवारी पंतप्रधानांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पदके दिली. या कार्यक्रमात एका विद्यार्थ्यांने घोषणा दिल्या असता प्रेक्षकांनी त्याला थापडबाजी केली.