28 September 2020

News Flash

अयोध्या सज्ज

राम मंदिराचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन : १७५ जणांना निमंत्रण

संग्रहित छायाचित्र

राम मंदिराचे उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन : १७५ जणांना निमंत्रण

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा ५ ऑगस्टला होणार असून, त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी पुन्हा अयोध्येत जाऊन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.

या सोहळ्यासाठीची भगव्या रंगातील निमंत्रण पत्रिका सोमवारी जाहीर करण्यात आली. निमंत्रण पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास या पाच मान्यवरांची नावे आहेत.

करोनाच्या उद्रेकामुळे कमीत कमी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. निमंत्रितांच्या यादीतील काही नावे वगळण्यात आली असून, फक्त १७५ जण सोहळ्यात सहभागी होतील. त्यापकी १३५ संत-महंत असून, उर्वरित ४० विशेष पाहुणे असतील, असे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

अडवाणी, जोशी नाहीत!

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उमा भारती हे तिघेही भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहणार नाहीत. करोनामुळे अयोध्येला न जाण्याचा निर्णय उमा भारती यांनी आधीच जाहीर केला होता. अडवाणी व जोशी यांना फोन करून निमंत्रण देण्यात आले. पण, ९० वर्षांपेक्षा जास्त वयोमान असलेल्या मान्यवरांनी करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन अयोध्येला येणे उचित ठरणार नाही. आम्ही त्यातील अनेकांना फोन करून क्षमाही मागितली आहे, असे चंपत राय यांनी सांगितले. प्रत्यक्ष समारंभाला येऊ न शकणाऱ्यांना दूरचित्रसंवाद व्यवस्थेद्वारे सोहळा पाहता येईल. निमंत्रण पत्रिकेवर सुरक्षाकोड असल्याने समारंभाच्या ठिकाणी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश मिळू शकेल.

मशिदीसाठी जागेचे हस्तांतरण

अयोध्येचे जिल्हाधिकारी अंजू कुमार झा यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदीसाठी पाच एकर जागा सुन्नी वक्फ बोर्डाकडे सुपूर्द केली. अयोध्येपासून २५ किमी अंतरावर गोरखपूर- लखनऊ रस्त्यावर फैजाबाद जिल्ह्यातील धन्नीपूर गावात मशिदीसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. मशीद बांधण्यासाठी इंडो-इस्लामिक कल्चरल फाऊंडेशन स्थापन करण्यात आले आहे.

‘रामाला मिशा असाव्यात’

प्रभू राम अतुलनीय, पूजनीय पुरुष दैवत होते. आतापर्यंत शिल्पकार, चित्रकार यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम दाखवले. निदान अयोध्यामध्ये उभारल्या जाणाऱ्या मंदिरातील मूर्तीमध्ये तरी त्याला मिशा असाव्यात, अशी मागणी मंदिर समितीमधील प्रमुख गोिवदगिरी यांच्याकडे करण्यात आल्याचे संभाजी भिडे यांनी सांगितले.

साडेबाराचा मुहूर्त

बुधवारी दुपारी साडेबारा वाजता भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ नंतर अयोध्येत पोहोचतील. ते हनुमान गढीला भेट देऊन हनुमानाची पूजा करतील आणि नंतर रामलल्लाचे दर्शन घेतील. त्यानंतर ते भूमिपूजन समारंभात सहभागी होतील, असे चंपत राय यांनी सांगितले. दरम्यान, जगतगुरू स्वामी स्वरूपानंदजी महाराज हे द्वारकापीठाचे शंकराचार्य असून त्यांनी ५ ऑगस्टचा मुहूर्त अशुभ असल्याचे सांगितल्याने भूमिपूजन समारंभ रद्द करावा, असे आवाहन काँग्रेसनेते दिग्विजय सिंह यांनी केल्याने नव्या वादास तोंड फुटले.

पक्षकार अन्सारींना पहिले निमंत्रण

भूमिपूजनाची पहिली निमंत्रण पत्रिका बाबरी मशीद प्रकरणातील पक्षकार इक्बाल अन्सारी यांना देण्यात आली. अन्सारी यांनी निमंत्रण स्वीकारले असून ही भगवान रामाचीच इच्छा होती, असे उद्गार त्यांनी काढले. अयोध्येत िहदू-मुस्लीम वर्षांनुवष्रे सामंजस्याने राहतात. मंदिर बनेल, अयोध्येचे भविष्यही बदलेल, ते अधिक सुंदर होईल. स्थानिकांना रोजगार मिळेल, असा आशावाद अन्सारी यांनी व्यक्त केला.

दिवाळी साजरी करा : भाजप

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी ५ ऑगस्टला करोनाचे भान ठेवून घरोघरी दिवाळी साजरी करावी, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी घरोघरी गुढय़ा-तोरणे उभारावीत, दारात कंदील, पणत्या लावाव्यात, सरकारी यंत्रणेची परवानगी घेऊन आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 12:18 am

Web Title: bhumi pujan of ram mandir at the hands of prime minister tomorrow abn 97
Next Stories
1 शैक्षणिक धोरण कृती आराखडय़ाच्या प्रतीक्षेत
2 त्रिभाषा सूत्रास तमिळनाडूचा विरोध
3 ‘पश्चिम बंगालमधील भाजपचे सर्व खासदार पक्षाबरोबरच’
Just Now!
X