पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी गुजरातमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. भूपेंद्र पटेल यांनी आज (सोमवार) राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर रविवारीच पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल झालेला नाही.

आज गांधीनगर येथील राजभवन येथे एका कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

&

;

मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत कसे पुढे आले भूपेंद्र पटेल?

भाजपाच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा धक्कादायक निर्णय घेत भूपेंद्र पटेल यांची गुजरातचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे. पटेल हे पाटीदार समाजातून आले आहेत, त्यामुळे भाजपाने निवडणुकीपूर्वी राज्यातील या प्रमुख समाजाला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला आहे. भूपेंद्र पटेल राज्यातील सर्व मोठ्या पाटीदार नेत्यांपेक्षा कमी लोकप्रिय असले तरी यांची निवड करण्यामागील एक कारण म्हणजे भाजपा राज्यातील बड्या पटेल नेत्यांमध्ये वर्चस्वाची गटबाजी असल्याचेही मानले जाते. याशिवाय, ते माजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळचे आहेत.

५९, वर्षीय पटेल हे सरदारधामच्या विश्वस्तांपैकी एक आहेत, ज्यांनी पाटीदार समाजाचे आंदोलन उभे केले होते. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर, नवीन मुख्यमंत्री म्हणून भूपेंद्र पटेल यांना पाटीदार मतांच्या दुव्याच्या रूपात पाहिले जात आहे. कारण, २०१७च्या निवडणुकीत पाटीदार आंदोलनामुळे भाजपाला मोठा त्रास सहन करावा लागला होता.

पटेल, ज्यांच्या नेतृत्वाखाली २०२२ च्या विधानसभा निवडणुका लढल्या जातील, त्यांनी २०१० मध्ये अहमदाबाद महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून पहिली मोठी निवडणूक लढवली होती. ते नगरसेवक म्हणून पहिल्या कार्यकाळात महापालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष झाले.

इंजीनियर, नगरसेवक, आमदार ते मुख्यमंत्री; सर्वांना मागे टाकत मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत कसे पुढे आले भूपेंद्र पटेल?

मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघ घाटलोडियामधून पटेल प्रथमच आमदार झाले आहेत. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत पटेल यांचा एक लाख मतांनी पराभव केला होता.

पटेल यांनी १९९० च्या दशकात अहमदाबादच्या मेमनगर नगरपालिका येथून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि १९९०-२००० आणि २००४-०६ मध्ये शहर नागरी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम केले. महामंडळाची निवडणूक लढण्यापूर्वी त्यांनी २००८-१० पर्यंत एएमसी स्कूल बोर्ड उपाध्यक्ष म्हणूनही काम केले.

मुख्यमंत्री पदावर नियुक्ती झाल्यानंतर पत्रकारांना सांगताना आनंदीबेन पटेल यांचे आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी आहेत असे म्हटले होते त्यामुळे आनंदीबेन त्यांच्या मार्गदर्शकांमध्ये आहेत हे स्पष्ट होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

पटेल २०१५ मध्ये AUDA (अहमदाबाद अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी)चे अध्यक्ष होते आणि त्यांनी २०२० मध्ये AMC मध्ये विलीन होण्यापूर्वी AUDA अंतर्गत असलेल्या बोपल-घुमा भागातील प्रमुख विकास प्रकल्पांना मंजुरी दिली. यामुळे अहमदाबादच्या बाहेरील भागात झपाट्याने विकसित होणारा परिसर हा अमित शाह यांच्या संसदीय मतदारसंघाचा भाग आहे.

सिव्हिल इंजिनिअर आणि गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट्स (GICEA) चे सदस्य, पटेल २५ वर्षांपासून रिअल इस्टेट व्यवसायात आहेत. पटेल यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि मित्रांमध्ये ते ईश्वरभक्त आणि धार्मिक म्हणून ओळखले जातात. ते दादा भगवान यांचे अनुयायी आहेत. म्हणूनच आम्ही त्याला दादा म्हणतो, असे एएमसीचे माजी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.