28 November 2020

News Flash

भुत्तो हत्याकांड : चौकशीसाठी मुशर्रफ तपास यंत्रणांच्या ताब्यात

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो हत्येप्रकरणी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी अध्यक्ष मुशर्रफ यांना ३० एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

| April 27, 2013 03:43 am

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो हत्येप्रकरणी येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने माजी अध्यक्ष मुशर्रफ यांना ३० एप्रिलपर्यंत तपास यंत्रणेच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भुत्तो यांच्या हत्याकांडप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुशर्रफ यांना ताब्यात द्यावे, अशी मागणी तपास यंत्रणेच्या वकिलांनी केली होती. न्या. चौधरी हबीब-ऊर-रेहमान यांनी ही मागणी मान्य केली. मुशर्रफ यांच्या फार्म हाऊसला उपकारागृहाचा दर्जा देण्यात आला असून तपास यंत्रणांमार्फत तेथेच त्यांची चौकशी केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 3:43 am

Web Title: bhutto murder case enquiry of musharuff
टॅग Enqury
Next Stories
1 काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांकडून चार पोलिसांची हत्या
2 गोव्यातील खरेदीवर परदेशी पर्यटकांना ‘व्हॅट’ परतावा!
3 भारतीय कैदी सरबजित सिंग कोमात, प्रकृती स्थिर होईपर्यंत सर्जरी अशक्य
Just Now!
X