वॉशिंग्टन : दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांच्याशी चर्चेनंतर अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांनी उत्तर कोरियाशी वाटाघाटींसाठी  खास दूताची नेमणूक केली आहे.

बायडेन यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले, की दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांच्याशी आपली भेट झाली, त्यानंतर आपण उत्तर कोरियातील दूत म्हणून संग किम यांची नियुक्ती केली आहे. बायडेन यांच्या चमूने दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून यांच्याशी सल्लामसलत केली होती.  त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दोन्ही नेत्यांनी उत्तर कोरियातील स्थितीवर चिंता व्यक्त केली असून दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्यात राजनैतिक संबंध सुधारले पाहिजेत असे मत व्यक्त केले आहे.  दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी त्याची गरज आहे. कोरियन द्वीपकल्प परिसरात अण्वस्त्र नि:शस्त्रीकरण करण्याची गरज आहे. अमेरिका यापुढील काळात दक्षिण कोरियाच्या संपर्कात राहील असे बायडेन यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष मून यांनी सांगितले, की दोन्ही देशांनी अण्वस्त्र निर्मूलनाचे काम करून शांतता प्रस्थापित केली पाहिजे.

करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अलीकडे बायडेन प्रशासनाने दक्षिण कोरियाच्या उत्तर कोरियाविषयक धोरणांचा आढावा घेतला होता. सिंगापूर संयुक्त निवेदनासाह तीन करारांचा विचार यात करण्यात आला. उत्तर कोरिया धोरणात अमेरिका योग्य मार्गक्रमण करीत असून दोन्ही देशात चांगला समन्वय आहे , तो प्रशंसनीय आहे असे त्यांनी म्हटले आहे. मून यांनी सुंग किम यांची उत्तर कोरिया धोरणविषयक विशेष प्रतिनिधी म्हणून नेमणूक केल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.