News Flash

इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष थांबवण्यासाठी बायडेन यांचा दबाव

बायडेन यांनी नेतान्याहू यांना ‘युद्धविरामाच्या मार्गाने जाण्यास’ सांगितल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पॅलेस्टिनी लोकांशी गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक चकमकी थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्राायलवरील दबाव वाढवला आहे. दिवसअखेरपर्यंत तणाव लक्षणीयरीत्या कमी व्हावा ही आपली अपेक्षा त्यांनी बुधवारी इस्राायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संवादात बोलून दाखवली.

बायडेन यांनी नेतान्याहू यांना ‘युद्धविरामाच्या मार्गाने जाण्यास’ सांगितल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. या युद्धात दोनशेहून अधिक लोक ठार झाले असल्याने बायडेन यांच्यावर याहून अधिक काही करण्याचा दबाव आहे. अमेरिकेचा मित्र असलेल्या इस्रायलला युद्धविरामासाठी थेट साकडे घालण्याचे त्यांनी बुधवारपर्यंत तरी टाळले होते. त्याऐवजी ‘शांत व सखोल’ कूटनीतीवर बायडेन प्रशासन भर देत आहे.

इस्रायली हवाई हल्ल्यात  सहा ठार

इस्रायलच्या हवाई हल्ल्यात बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या हल्ल्यात सहा जण ठार झाले. एका मोठ्या घरावर बॉम्बफेक करून ते जमीनदोस्त करण्यात आले. त्यातच तेथे जवळपास राहणाऱ्या सहा जणांचा अंत झाला. लष्कराने म्हटले आहे की, हल्ल्यांची व्याप्ती वाढवली असून हमास शासित प्रदेशात अग्निबाणांचा मारा सुरू असताना दक्षिणेकडे हवाई हल्ले सुरू करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2021 1:09 am

Web Title: biden pressures israel to end palestinian conflict akp 94
Next Stories
1 पवार यांच्या मागणीनंतर खतांच्या किंमती पूर्ववत
2 ‘सिंगापूर’वरून केंद्र-‘आप’मध्ये खडाजंगी
3 व्यक्तिगतता धोरण गुंडाळण्याचा व्हॉट्सअ‍ॅपला सरकारचा आदेश
Just Now!
X