24 November 2020

News Flash

भारतातील हवा घाणेरडी म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना बिडेन यांनी सुनावलं; म्हणाले,…

काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?

फोटो सौजन्य - ANI

अमेरिकेत होत असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन हे निवडणूक लढवत आहेत. दोघांमध्ये अध्यक्षीय निवडणुकीतील शेवटची चर्चा शुक्रवारी झाली. यावेळी ट्रम्प यांनी बोलताना भारतातील हवा घाणेरडी असल्याची टीका केली होती. त्यावरून जो बिडेन यांनी ट्रम्प यांना सुनावलं आहे.

भारतातील हवा घाणेरडी असल्याचं सांगत ट्रम्प यांनी भारताच्या हवामान बदलांविषयीच्या कामावर शंका उपस्थित केल्या होत्या. या विधानावर जो बिडेन यांनी नाराजी व्यक्त केली. “राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारताला घाणेरडं म्हटलं आहे. मित्रांविषयी कसं बोलायला हवं, हे पण माहिती नाही आणि जागतिक स्तरावरील हवामान बदलाच्या आव्हानांना कसं सोडवायला हवं. आपण आणि सहकारी कमला हॅरिस आम्ही दोघंही भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीला महत्त्व देतो,” असं बिडेन यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?

“डोनाल्ड ट्रम्प म्हणाले,”अमेरिकेत गेल्या ३५ वर्षात सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होत आहे. आपली हवा स्वच्छ आहे. पाणी सर्वात स्वच्छ आहे आणि कार्बन उत्सर्जन सर्वात कमी आहे. चीनकडे पहा. किती घाणेरडी हवा आहे. रशियाकडे पहा किती घाण आहे. भारताकडे पहा किती घाणेरडी हवा आहे,” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 1:54 pm

Web Title: biden slam trump on calling indias air filthy bmh 90
Next Stories
1 तुमच्या आई-वडिलांना हा प्रश्न विचारा, मुख्यमंत्र्यांचा संयम सुटला
2 खरेदीसाठी जाताना ‘व्होकल फॉर लोकल’चा संकल्प लक्षात ठेवा – पंतप्रधान मोदी
3 देशभरात २४ तासांत ५० हजार १२९ नवे करोनाबाधित, ५७८ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X