ब्रिटनमधील चॅनेल ४ या वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय अशा ‘डील ऑर नो डील’ या कार्यक्रमात रूप सिंग नावाच्या एका शीख उमेदवाराने अडीच लाख पौंडांचे इनाम जिंकले. ही स्पर्धा जिंकणारा रूप सिंग हा सातवा स्पर्धक असून चौथा पुरुष स्पर्धक आहे. माझ्या मुलीने माझ्याकडे स्पर्धेच्या आदल्या रात्री ‘बाबा तुम्ही विजयी झालेले मला पाहायचे आहे’ असे म्हटले होते. प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान, ४६ हजार पौंड जिंकल्यावर जेव्हा मला ‘डील ऑर नो डील’ अशी विचारणा करण्यात आली, तेव्हा मला माझ्या चिमुकलीचे ते उद्गार आठवले आणि मी ‘नो डील’ म्हणालो. या निर्णयामुळेच पुढे अडीच लाख पौंड (सुमारे २ कोटी ५९ लाख रुपये) जिंकण्याची संधी मला मिळाली, असे रूप सिंग यांनी सांगितले. सुमारे २२ खोक्यांमध्ये १ पौंडापासून अडीच लाख पौंडांपर्यंत विशिष्ट रकमा ठेवण्यात येतात. कोणत्याही टप्प्यावर मिळालेली रक्कम घेऊन खेळ सोडण्याचे स्वातंत्र्य खेळाडूस असते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 14, 2014 2:35 am