अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारासाठी एप्रिलमध्ये ६१.७  दशलक्ष डॉलरचा  निधी जमवण्यात आला आहे.त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांच्या प्रचारासाठी ६०.५ दशलक्ष डॉलरचा निधी जमवला आहे.

अध्यक्षीय निवडणूक ३ नोव्हेंबरला होणार असून दोन्ही उमेदवारांनी निधी जमवणे सुरू ठेवले आहे. संसर्गाच्या भीतीमुळे सध्या दोन्ही उमेदवारांच्या कुठल्याही जाहीर सभा आयोजित करण्यात आलेल्या नाहीत.

अमेरिकेत आत्तापर्यंत करोनाने ८० हजार बळी गेले असून १३ लाख ४७ हजार जणांना संसर्ग झाला आहे.  रिपब्लिकन राष्ट्रीय समितीने म्हटले आहे, ट्रम्प फॉर प्रेसिडेंट इन्कार्पोरेशन व  रिपब्लिकन राष्ट्रीय समिती यांनी एप्रिल अखेर ६१.७ दशलक्ष डॉलर जमवले आहेत. डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीने एप्रिलमध्ये जो बिडेन यांच्यासाठी ६०.५ दशलक्ष डॉलर्स जमवले आहे. एप्रिलमध्ये ३२.६३ डॉलर ऑनलाइन मदत मिळाली असून एप्रिलअखेर ६०.५ दशलक्ष डॉलर निधी जमवण्यात आला आहे.