रेल्वे (आरआरबी, आरआरसी), स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सेलेक्शन (आयबीपीएस) च्या भरती परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी मोठी माहिती समोर आली आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये भरतीसाठी कॉमन पात्रता परीक्षा (सीईटी) आता पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस घेण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की विविध सरकारी नोकऱ्यांसाठी (एनआरए सीईटी) प्रथम सीईटी या वर्षाच्या अखेरीस घेण्यात येणार होते परंतु कोविड -१९ मुळे  यास उशीर झाला आहे.

एनआरए ही एक बहु-एजन्सी संस्था असेल जी गट ब आणि क (नॉन-टेक्निकल) पदांसाठी उमेदवारांची तपासणी करण्यासाठी आणि शॉर्टलिस्टसाठी सामान्य परीक्षा असेल. या सुधारणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक परीक्षा केंद्र असेल जे दुर्गम भागात राहणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देता येणार आहे, असे मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले.

यामुळे महिला आणि अपंग उमेदवारांसोबत त्यांना सुद्धा फायद्याचे ठरणार आहे जे वेगवेगळ्या केंद्रांमध्ये जाण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसणार आहेत. विद्यमान केंद्रीय भरती एजन्सी जसे कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भर्ती बोर्ड (आरआरबी) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक भर्ती बोर्ड (आयबीपीएस) त्यांच्या आवश्यकतेनुसार विशेष भरती घेत राहतील आणि उमेदवारांच्या नोकरीसाठी सीईटी परीक्षा केवळ प्राथमिक तपासणीसाठी घेतली जाईल.

एनआरए सीईटी विषयी जाणून घ्या खास गोष्टी

राष्ट्रीय भरती एजन्सी (एनआरए) सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने सरकारी नोकरीसाठी उमेदवारांची प्राथमिक तपासणी करणार आहे. एनआरए सरकारी नोकरीसाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी कॉमन पात्रता परीक्षा (सीईटी) घेईल. एनआरए प्रथम कर्मचारी निवड आयोग (एसएससी), रेल्वे भर्ती बोर्ड (आरआरबी) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक निवड (आयबीपीएस) साठी सीईटीमार्फत उमेदवारांची पडताळणी करेल. अंतिम भरती संबंधित एजन्सीद्वारे केल्या जातील. सरकारने म्हटले आहे की राज्य सरकार कॉमन एलिजिबिलिटी टेस्टमध्ये उमेदवारांकडून मिळालेल्या गुणांची भरतीसाठी वापर करता येईल.

एनआरए सीईटीची सुरूवात रेल्वे, बँकिंग आणि एसएससीच्या प्राथमिक परीक्षांच्या विलीनीकरणातून होईल. म्हणजेच आरआरबी, आयबीपीएस आणि एसएससी जे भरती परीक्षा घेतात, केवळ त्यांच्या प्राथमिक परीक्षा एनआरएद्वारे घेतल्या जातील. आरआरबी, आयबीपीएस आणि एसएससी प्राथमिक परीक्षा झाल्यानंतर भरती प्रक्रिया आणि परीक्षा टप्प्याटप्प्याने हाताळतील. आरआरबी, आयबीपीएस आणि एसएससी नंतर हळूहळू इतर भरती परीक्षांचादेखील त्यात समावेश केला जाईल. केंद्राच्या सुमारे २० एजन्सी भरती परीक्षा घेतात ज्या टप्प्याटप्प्याने विलीन केल्या जातील.